AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातारा जिल्हा बँकेत नवा ट्विस्ट! रामराजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला; आता शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटलांची भूमिका निर्णायक?

Satara District Bank Elections News: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकरांनी माघार घेतली आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या या निर्णयाचे कारण समोर आले आहे.

सातारा जिल्हा बँकेत नवा ट्विस्ट! रामराजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला; आता शिवेंद्रसिंहराजे आणि मकरंद पाटलांची भूमिका निर्णायक?
| Updated on: Oct 19, 2026 | 5:03 PM
Share

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृषी प्रक्रिया आणि फलटण विकास सेवा सोसायटी या दोन्ही मतदारसंघांतील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यांच्या या माघारीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने महायुतीतील मातब्बर नेत्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

जिल्हा बँकेच्या नियमांमधील दहा वर्षांच्या निकषामुळे संभाव्य अपात्रतेचा धोका लक्षात घेऊन रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या निर्णयामुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या सहकार राजकारणात पुढे कोणती समीकरणं तयार होणार, याकडे लक्ष लागलं आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.

घटस्थापनेला जागावाटप जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र विजयादशमी उलटूनही जागावाटपाचा निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नेत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. कोणाकडे किती ठराव आहेत. त्या संख्येनुसार कोणाला किती जागा द्यायच्या, या सूत्रावर महायुतीची चर्चा अडकली असल्याचे चित्र आहे. ठरावांची संख्या आणि स्थानिक राजकीय प्रभाव यांचा विचार करून जागावाटप करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. त्यामुळे जागांचे अंतिम गणित जुळवताना घटक पक्षांमध्ये समन्वय साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची भूमिका या निवडणुकीत कळीची ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमधील समन्वय आणि जागावाटपाबाबतची भूमिका महायुतीच्या पुढील रणनीतीसाठी महत्त्वाची ठरू शकते. रामराजे नाईक निंबाळकरांची माघार आणि जागावाटपाचा रखडलेला निर्णय या दोन घडामोडींमुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक अधिक लक्षवेधी झाली आहे. आता महायुती जागावाटपाचा तिढा कसा सोडवते आणि उमेदवारीचे अंतिम चित्र कधी स्पष्ट होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...