अनिल सोले यांनी उमेदवारी मागे घेतली, भावुक झाले होते.. नक्की काय घडलं?
आज आमच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे चर्चेसाठी येथे उपस्थित होते. त्यांच्यावरच आता येथील निवडणूक आणि इतर जबाबदारी सोपवलेली आहे. डॉ.कोठेकर, संघटन मंत्री सतीशजी चर्चेसाठी होते, शेवट गोड झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर पदवीधर निवडणूकीतील भाजपातील बंड अखेर क्षमले आहे. बंडखोर अनिल सोले यांनी अखेर आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी सुधाकर कोहळे यांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई अखेर कामी आली आहे. अनिल सोले आणि गिरीश व्यास यांनी देखील आपला राजीनामा मागे घेतला असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी अनिल सोले अतिशय भावूक झाले. म्हणाले की जुने कार्यकर्ते पक्षासाठी जीवाचे रान करतात. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा असते. मी खरंतर प्रचार सुरु केला होता आणि देवळीला गेलो होतो. तेथे मला फोन आला की मुख्यमंत्री माझ्या घरी आले आहेत आणि मी तेथून आल्याचे अनिल सोले यांनी सांगितले.
एवढी वर्षे मी पक्ष वाढवण्याचे काम केले,आज सतिश डोहन साहेब आले, त्यांची पहिली एन्ट्री होती. माझी त्यांच्याशी ओळख होती. गडकरी साहेबांनी विनंती केली होती, तू देवेंद्र यांच्याशी बोलून मान्य कर सगळे. असे अनेक कार्यकर्ते ज्यांचे, फार वय झालेले नाही. त्या कार्यकर्त्यांना आता काम दिले जाईल त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल असे आश्वासन मला देवेंद्रजी यांनी दिल्याचे सदगतीत होत अनिल सोले यांनी सांगितले. अहोरात्र अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत काम केले होते. त्यांना वाटात होते, मला संधी मिळाली. आज खरे तर मी प्रचाराला सुरुवात केली होती. मी देवळीला गेलो होता. पण मुख्यमंत्री आल्याचे फोन मला आल्यानंतर मी येण्याचा निर्णय घेतला. माझ्या अपक्ष उमेदवारीमुळे काही पक्ष कार्यकर्त्यांना वाईट वाटले त्यांची मी क्षमा मागतो. आणि मी माझी उमेदवारी मागे घेतो असेही अनिल सोले यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जे मेन स्ट्रीमपासून दूर गेले, त्यांना मुख्यप्रवाहात आणणार
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनिल सोले यांच्याशी आम्ही बोलणी केली आहेत. त्यांची पक्षावर नाराजी नव्हती तर त्यांची कार्यपद्धतीवर नाराजी होती. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही जुने कार्यकर्ते होते. जे मेन स्ट्रीमपासून दूर गेले आहेत. त्यांना आम्ही पक्षात आता काम देण्याचा निर्णय घेतला आहे. इतके वर्षे अनिल सोले यांनी कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. त्यांना कितीही सात्विक संताप असला. तरी या निवडणूकीत ते भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्य करतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अनिल सोले हे प्रचाराची धुरा हाती घेतील. त्यांच्या ओळखीचा हा मतदार संघ आहे. आता मतदार यादीतून नाव मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यांचे नाव असले तरी ते आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज आमच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे चर्चेसाठी उपस्थित होते. त्यांच्यावरच आता येथील निवडणूक आणि इतर जबाबदारी सोपवलेली आहे. डॉ.कोठेकर, संघटन मंत्री सतीशजी होते आणि शेवट गोड झाला आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.