AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Crime : बीडच्या माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा खळबळजनक दावा, नर्तकी..

बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. आता कुटुंबियांनी मोठा दावा केलाय. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पूजा गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Solapur Crime  : बीडच्या माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्या की आत्महत्या? नातेवाईकांचा खळबळजनक दावा, नर्तकी..
Govind Barge case
| Updated on: Sep 10, 2025 | 4:24 PM
Share

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी धक्कादायक पाऊल उचलत थेट आयुष्य संपवले. आपल्या चारचाकी गाडीमध्येच त्यांनी गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. पोलिसांनी या प्रकरण कला केंद्रात डान्स करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले असून गुन्हाही दाखल केलाय. मात्र, गोविंद बर्गे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलेला असताना आता नातेवाईकांनी थेट मोठा खुलासा केला. नातेवाईकांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आल्याचे बघायला मिळतंय. गोविंद हा आत्महत्या करूच शकत नसल्याचा दावा त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाने केला.

गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी म्हटले की, आमच्या सरपंचांना वैराग पोलिसांकडून फोन आला आण त्यांनी सांगितले की, तुमच्या गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी त्यांच्याच चारचाकी गाडीमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडली आणि त्यांचे निधन झाले. आम्हाला या घटनेची माहिती कळताच आम्ही लगेचच सासुरे गावाकडे धाव घेतली. आम्ही तिथे ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी त्याच्या गाडीची पूर्ण बॅटरी उतरली होती. हे आम्हाला गेल्यावरच संशयास्पद वाटले.

गोविंदने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्याच्याजवळ साधी काठीही ठेवली नाही मग त्याच्याकडे बंदूक कुठून आली. मुळात म्हणजे आमच्या गोविंदकडे कधी बंदूक नव्हतीच. बरोबर काल रात्रीच त्याच्याजवळ ही बंदूक कशी? गोविंदने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आलीये, असा दावा नातेवाईकांकडून केला जातोय. आता नातेवाईकांच्या या दाव्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण आल्याचे बघायला मिळतंय. आता प्रश्न उपस्थित राहतोय की, गोविंदने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आलीये.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपाल केला जातोय. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते आणि गेवराईतील बंगला नावावर करण्यासाठी ती गोविंदवर दबाव टाकत होती. फक्त हेच नाही तर आतापर्यंत गोविंदने महागडे सोन्याचे दागिने आणि मोठा पैसा हा तिला दिल्याचे सांगितले जाते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...