Solapur Crime : बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे स्वत:ला संपवत असताना थेट नर्तकी पूजा करत होती व्हिडीओ तयार, चक्क इंस्टाग्रामवर…
Govind Barge Case Pooja Gaikwad Video : गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येताना दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणी पूजा गायकवाड या कला केंद्रातील नर्तकीवर गुन्हा दाखल केलाय.

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्री संपवली. वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलत सर्वांनाच मोठा धक्का दिला. गोविंद बर्गे राजकारणासोबतच व्यवसायात देखील सक्रिय होते, मागील काही वर्षांपासून ते प्लॉटिंगचा व्यवसाय करत त्यातून मोठा पैसा त्यांच्याकडे आला. गेवराईला टोलेजंग बंगला, मोठी जमीन फिरायला चारचाकी गाडी…यादरम्यानच गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद लागला आणि तिथेच त्यांची ओळख ही नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू पूजासाठी गोविंद बर्गे दररोजच कला केंद्रात जायला लागला आणि पूजाच्या प्रेमात पडला.
दीड वर्षात गोविंद बर्गे याने पूजाला आयफोन आणि महागडे सोन्याचे दागिने दिले. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढल्या आणि तिला गोविंदचा गेवराईतील बंगला आणि काही जमीन हवी होती. यावरून तिने गोविंदच्या मागे तगादा लावला आणि त्याच्यासोबत बोलणेही बंद केले. पूजा बोलत नसल्याने गोविंद तणावात होता आणि तिला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी तो प्रयत्न करत राहिला.
एकीकडे पूजाच्या प्रेमात गोविंद इतका वेडा झाला की, त्याला काहीच कळत नव्हते. मात्र, दुसरीकडे पूजा डान्स करून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्यात मग्न होती. गोविंद हा पूजाच्या बार्शीतील सासुरे गावात तिला भेटण्यासाठी पोहोचला. मात्र, त्यानंतरही काहीच मार्ग निघू शकला नाही. गोविंद हा तणावात असताना पूजा मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्यात व्यस्त होती. गोविंदने स्वत:वर गोळी झाडण्याच्या दरम्यानच डान्सचा एक व्हिडीओ पूजा हिने सोशल मीडियावर शेअर केला.
View this post on Instagram
एकीकडे गोविंदला बदनामी करण्याची आणि बलात्कार केल्याची तक्रार देणार असल्याची धमकी पूजाने दिली आणि दुसरीकडे तिने उससे नजर मिली बीच बाजार में..या गाण्यावर डान्स केला आणि त्याचाच व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
