AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे प्रकरणात अत्यंत मोठे अपडेट, कला केंद्रातील नर्तकीवर गंभीर आरोप, पोलिसांनी…

बर्गे कुटुंबियांवर शोककळा पसलीये. माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत मोठी माहिती दिली असून नेमके काय घडले हे सांगितले.

बीडचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे प्रकरणात अत्यंत मोठे अपडेट, कला केंद्रातील नर्तकीवर गंभीर आरोप, पोलिसांनी...
Govind Barge case
| Updated on: Sep 10, 2025 | 1:52 PM
Share

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. गोविंदने कमी वयात प्लॉटिंग व्यवसायातून मोठा पैसा कमावला. मात्र, यादरम्यान गोविंदला कला केंद्रात जाण्याची सवय झाली. कला केंद्रातील पूजा गायकवाड हिच्या प्रेमात गोविंद इतका वेडा झाला की, त्याला बरोबर काय आणि चुकीचे हे समजणे देखील कठीण झाले. पूजा बोलत नव्हती, तिने काही अटी गोविंदसमोर ठेवल्या होत्या. तो शेवटी भेटायला तिच्या घरी गेला. मात्र, तिथेही काही होऊ शकले नाही आणि त्याने स्वत: च्या चारचाकी गाडीत गोळी झाडली आणि आयुष्य संपवले.

आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी माहिती सांगितले आहे. माजी उपसरपंच गोविंद बर्गे याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल केलाय. बी एन एस कलम 108 नुसार वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाड आणि मृत गोविंद यांच्यात मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गावाकडील घर नावावर कर, बार्शीत शेतजामीन घेऊन दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजा गायकवाड देत होती.

गोविंद बर्गे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पूजा गायकवाड हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोलापुरातील बार्शीत पूजाच्या घराच्या जवळच गोविंद याने आपल्या चारचाकी गाडीत गोळी झाडली होती. त्याने स्वत:वर गोळी झाडण्याच्या अगोदर गाडी लॉक केली. गोविंद जगन्नाथ बर्गे असे या आत्महत्या केलेल्या उपसरपंचाचे नाव असून तो मूळचा गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचा रहिवासी आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली.

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात शेवटी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल झालाय. गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी पूजावर काही गंभीर आरोपही केली आहेत. मागील दीड वर्षांपासून पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, पूजा ही त्याच्यामागे विविध गोष्टींसाठी तगादा लावताना दिसली आणि त्याच्यासोबत बोलणे देखील बंद केले. फक्त हेच नाही तर गोविंद याने पूजाला आयफोन आणि महागडे दागिने देखील अनेकदा दिली.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.