AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?

राजपथावरील संचलनात होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार आहे. | Maharashtra tableau Chitrarath

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?
राजपथावरील संचलनात होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार आहे.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Jan 25, 2021 | 11:36 PM
Share

मुंबई: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनात (rajpath parade 2021) सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत संचलनाची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा टिपण्यात आलेला सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Maharashtra tableau Chitrarath in rajpath parade 2021)

राजपथावरील संचलनात होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा संत परंपरेचा इतिहास पाहायला मिळणार आहे. यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा साकारण्यात आला आहे.

राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमीच छाप पडली आहे. सुरुवातीची अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र, नंतर महाराष्ट्राचा संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015 मध्ये पंढरीची वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती.

2020 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही

मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झाला नव्हता. 2020 च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्यावर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीचती 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता. पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता.

संबंधित बातम्या:

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल

(Maharashtra tableau Chitrarath in rajpath parade 2021)

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...