तोंड उघडलं की गटार… मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या धक्कादायक ऑडिओ क्लिपवर रोहिणी खडसे संतापल्या..

भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे नेते विजय चाैधरी यांच्यातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली. या व्हायरल ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली. रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. यावर रोहिणी खडसे यांनी भाष्य केले.

तोंड उघडलं की गटार... मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या धक्कादायक ऑडिओ क्लिपवर रोहिणी खडसे संतापल्या..
Girish Mahajan Raksha Khadse Rohini Khadse
| Updated on: Jul 30, 2026 | 2:25 PM

मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आली. हेच नाही तर वारंवार विजय चाैधरी यांच्याकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली. विजय चाैधरी हे वारंवार रक्षा खडसे यांच्याबद्दल धक्कादायक भाष्य करत असताना मंत्री गिरीश महाजन हम्म… हम्म… म्हणजे ऐकत होते. यादरम्यानच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी कुठेही विजय चाैधरी यांना थांबवले नाही. फक्त रक्षा खडसे यांच्याबद्दलच नाही तर एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्याबद्दलही काही चुकीच्या गोष्टी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलल्या गेल्या आहेत. विजय चाैधरी भाजपालाही सुनावताना दिसले. रक्षा खडसे यांचा राजीनामा झालाच पाहिजे, पक्षाची अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही, असेही विजय चाैधरी यांनी म्हटले.

रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे एकाच घरात राहत असल्याचेही ते वारंवार म्हणताना दिसत आहेत. आता या व्हायरल ऑडिओ क्लिपला रोहिणी खडसे यांनी मोठे उत्तर दिले. रोहिणी खडसे यांनी म्हटले की, ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर असं वाटतंय की तोंड उघडलं की गटार… भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मुखामध्ये राम तर यांच्या स्वभावामध्ये रावण आहे…

पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटले, हे संभाषण एका मंत्र्यासोबत केल्याची ऑडिओ आहे ते तरी महिलांबाबत कसं काय ऐकू शकतात. आम्ही तर विरोधक आहोत. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या महिलांबाबत या ऑडिओमध्ये संतापजनक भाषा वापरली जात आहे. भाजपमध्ये आता संस्कृती राहिलेले नाही. अशाप्रकारे गटारी सारखी भाषा केल्याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का?

अशांचा राजीनामा न घेता त्यांना बंडतर्फ करायला हवं. या ऑडिओ क्लिपमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महिलांबाबतची घाणेरडी वृत्ती समोर आली आहे. भाजपच्या हिना गावित यांच्याबाबतही घाणेरडे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले. खडसे आणि महाजन हा फार जुना वाद आहे. त्यामध्येच आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us