AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून टाकलं

सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानाचं समर्थन केलं.

अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून टाकलं
rohit pawar newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 1:38 PM
Share

अजितदादांच्या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात राजकारण पेटलं आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी खंत व्यक्त केली. तर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या अपघातावरून राजकारण करू नका, असा सल्ला दिला. दोन्ही गटात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपावर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन केलं.

रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांनी जे विधान केले आहे, ते माझ्याबद्दल नव्हतं. मी त्याच परिवारात जन्माला आलोय, मी देखील पवार आहे. जे गेले, ते माझे काका आहेत. पुतण्या काकासाठी लढतोय. त्यांचा अपघात झाला, त्याचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. जे स्वतःला दादाचे मित्र म्हणायचे, ते त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत नाही. आमची मागणी जर कोणाला अयोग्य वाटतं नसेल, तर ते त्यांना लखलाभ. मला जे वाटले ते मी बोलतो आणि करतो, मी तेच करणार. सुप्रियाताई योग्यच बोलल्या ना…’. विक्रम काकडे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. यावर रोहित पवार म्हणाले, त्यांना कंस्ट्रक्शन सोडून वेगळं काही कळत का? या लोकांसमोर पवारसाहेब राजकारणाशी संबंधित चर्चा करणार का? एवढी परिपक्वता आहे का?’.

सीईटी सेलवर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘सीइटी सेल कडे ३ वेळा इथे आम्ही आलो आहोत. शिंगारे सर आणि आणि काही पालक देखील आमच्या सोबत आहेत. अधिकाऱ्यांना भेटलो आहोत. एज्यु स्पार्क नावाच्या कंपनीबाबत आम्ही बोललो आहोत. त्यांनी केवळ थातूरमातूर उत्तरे दिली आहे. टीसीएसला काम मिळालं होतं, त्यांना टेक्निकल बीडमध्ये चांगले मार्क होते, तरी देखील त्यांना कंत्राट दिलं नाही. मेरिटेक कंपनी आहे, जिला काम देणार नाही हे तावडे मंत्री असताना ठरलं होतं. तरी देखील कंत्राट दिलं आहे’.

‘सीइटी सेलचा डेटा लीक झाला आहे. साडे चार लाख मुलांचा डेटा लीक झाला होता. शिंगारे सर यांनी तो डेटा देखील सेल ला दिला आहे, सीइटी सेलने देखील मान्य केलं की हा डेटा व्हायरलं झाला आहे. आम्ही १ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाणार आहोत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. पोलीस गरीब मुलांच्या बाजूने उभे राहते का हे पाहणार आहोत. सीईटी सेल सध्या करप्शन, एक्स्प्लॉयटेशन आणि एक्सटॉर्शनच केंद्र झालं आहे. रोहित पवार जे आरोप करतात ते हवेत करत नाहीत. आम्ही पुरावे घेऊन बोलत असतो. एज्यु स्पार्क नावाची कंपनी आहे. रुस्तम केरीवाला आणि इतर २ जण आहेत, ते एकमेकांच्या कंपनीवर डायरेक्टर आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला.

‘2021 साली आमचं सरकार होतं, त्यावेळी ज्यांनी कंत्राट त्या कंपनीला त्या नेत्यांवर कारवाई करा. 2022- 23 साली सुद्धा या कंपनीबाबत रिव्हिजन झालं होतं. तरीदेखील त्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. 2021 साली उदय सामंत मंत्री होते, त्यांनी या कंपनीला कंत्राट दिलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक गाव आहे, त्या गावातील काही मुले आहेत, ज्यांनी बँगलोअरला जाऊन एज्युस्पार्कसोबत व्यवहार करून चांगले पर्संटाइन मिळवले आहेत, याचा देखील शोध घ्यायला हवा, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी पुढे केला.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?