सचिन वाझेचा मार्ग मोकळा, NIA ला धक्का, घडामोडींना वेग, हायकोर्टाचा..
सचिन वाझेच्या जामिन प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हायकोर्टाने वाझेचा जामिनावर सुनावणीस नकार दिला. मुख्य न्यायमुर्तींकडे सुनावणीसाठी NIA प्रयत्न करत आहे. हा शेवटचा पर्याय आहे.

अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. मुंबईतील सत्र न्यायालयाकडून माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेना जामीन मंजूर करण्यात आला होता. तब्बल साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर जामीन दिला. मनसुख हिरेन प्रकरणातही वाझे आरोपी आहेत. दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला. वाझेला मिळालेल्या जामिनाविरोधात NIA ने हायकोर्टात धाव घेतली. ज्यावर नुकताच कोर्टाने थेट मोठा निर्णय घेतला. सचिन वाझेचा मार्ग मोकळा झाला असून जामीन रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला. हेच नाही तर पुन्हा सुनावणीसही नकार दिला आहे. ज्यामुळे आता वाझे तुरुंगातून बाहेर येणार असल्याचे आता स्पष्ट झाले. हा सचिन वाझेला अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल.
चीफ जस्टिस यांच्यासमोर सचिन वाझे यांच्या जामिनाबाबत सुनावणी झाली. न्यायाधीश भारती डांगरे यांनी सुनावणीस नकार दिला. हे प्रकरण माझ्या अख्यातरित येत नाही असं म्हणत सुनावणीस नकार दिला होता. सचिन वाझे प्रकरणावर सुनावणी घेण्यास दुसऱ्यांदा हायकोर्टाने नकार दिला. काल न्यायाधीश सारंग कोतवाल यांनीही या प्रकरणावर सुनावणी करण्यास नकार दिला होता. मुख्य न्यायाधिशांकडे सुनावनी घेण्यासाठी NIA चे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासोबत बसणारे न्यायाधीश आशिष चव्हाण हे अनिल देशमुख यांचे वकील होते. अनिल देशमुखांच्या सीबीआयच्या प्रकरणात न्यायाधीश आशिष चव्हाण हे आधी वकील म्हणून काम करत होते. मात्र, सचिन वाझेला जामीन मंजूर झाला असला तरीही पाच जिल्ह्यात येण्यास प्रवेशबंदी घालण्यात आली. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश आहे.
कोर्टाच्या सुनावणीसाठी फक्त या जिल्ह्यात येण्यास प्रवेश आहे, त्यानंतर परत या जिल्ह्यांमध्ये येता येणार नाही. सचिन वाझे तुरुंगात गेल्यापासून एकेक दिवस मोजत होता. वाझेचा तुरुंगातील आज दोन हजारवा दिवस आहे. हायकोर्टाने जामिन रद्द न केल्याने आज सचिन वाझे तुरुंगातून सुटणार आहे. सचिन वाझे याचा नवीन मुक्काम पुण्यात असणार आहे.