सचिन वाझेनं तुरुंगात लिहिलेलं तिसरं पुस्तक प्रकाशित, मुखपृष्ठ समोर; नेमकं नाव काय?
Sachin Waze Book: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. त्याने लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला एंटिलिया स्फोटक प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. त्याला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही सापडली होती. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणातही वाझेला जामीन मंजूर झाला आहे. यानंतर सचिन वाझेने तुरुंगातून लिहिलेले तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तसेच तो आता कुठे राहणार याबाबत माहिती समोर आली आहे.
तुरुंगात सचिन वाझेने राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणावर पुस्तक लिहिले होते. Lesser Man Bigger Target – सामान्य माणूस मोठे लक्ष्य या नावाचे राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारीत हे पुस्तक आहे. सचिन वाझेचे हे पुस्तक अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले आहे. याआधी बीएनएनएस आणि युएपीए कायद्यावर सचिन वाझेने पुस्तक लिहिले आहे.
तर आता सचिन वाझे पुण्यात वास्तव्यास जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वाझे यांना वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोर्टाने जामीन दिल्यानंतर या ५ जिल्ह्यात वास्तव्य न करण्याचे कोर्टाची अट होती. यानंतर त्याने पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन वाझेने पुण्यात वास्तव्य करणार असल्याची माहिती कोर्टाला दिली आहे.
तर सचिन वाझेची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जामीनपत्रावर आणि तेवढ्याच रकमेच्या स्थानिक जामिनावर सुटका करण्यात आली. सुमारे साडेपाच वर्षांची प्रदीर्घ तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने वाझेला त्याचा पासपोर्ट असल्यास तो एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश दिले.