Ramesh Patil: ‘मी तर कामाचा माणूस’ रमेश पाटील ही मैदानात, छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत इन्फ्लुएन्सरचा तडका

Chhatrapati Sambhajinagar Graduate Constituency Election: राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासोबतच पदवीधर मतदारसंघाचीही निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत केवळ राजकीय नेतेच नाही तर सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही उतरल्याने तडका लागला आहे.

Ramesh Patil: मी तर कामाचा माणूस रमेश पाटील ही मैदानात, छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत इन्फ्लुएन्सरचा तडका
रमेश पाटील, रविराज साबळे
| Updated on: Oct 01, 2026 | 8:05 AM

Ramesh Patil-Raviraj Sable Patil : राज्यात विधान परिषदेच्या आमदारकीचे वेध अनेकांना लागले आहे. शिक्षक मतदारसंघासोबतच पदवीधर मतदारसंघात अनेकांनी शड्डू ठोकले आहेत. दोन्ही ठिकाणी रस्सीखेच दिसत आहे. या निवडणुकीत केवळ राजकीय नेतेच नाही तर आता सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही उतरल्याने चुरस वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि सोशल मीडिया स्टार रविराज साबळे यांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हान उभे केले आहे. इथल्या पदवीधर मतदार संघाची निवडणुकीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही उतरल्याने तडका लागला आहे.

कॉल रेकॉर्डिंग किंग

Loading...

रमेश पाटील हे सामाजिक कार्यकर्ते, नेते आहेत. पण त्यांची ओळख जनमाणसात कॉल रेकॉर्डिंग किंग अशी आहे. ते बिनधास्त कुणालाही फोन लावून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. एखाद्या नेत्याला खडसावतात. अधिकाऱ्याला जाब विचारतात. तर चांगल्या माणसाचे कौतुकही करतात. आता तेही पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट करून उमेदवारी जाहीर केली आहे.

रमेश पाटील यांचे मतदारांना आवाहन

रमेश पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात “आपल्या सर्वांच्या जीवनात पदवी हे केवळ एक कागदाचे प्रमाणपत्र नाही, तर ती प्रगतीची आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची एक गुरुकिल्ली आहे. मी नेहमीच मानत आलो आहे की, शिक्षण हे आपल्याला विचारांची प्रगल्भता देते आणि जबाबदारीने काम करण्याची ऊर्जा देते. आज मी एका महत्त्वपूर्ण कारणासाठी आपल्या सर्वांसमोर आलो आहे. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ एक राजकीय लढाई नसून, ती सुशिक्षित समाजाच्या विचारांची आणि अपेक्षांची एक परखड परीक्षा आहे”, असे मत मांडत त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

रविराज साबळे पाटीलही मैदानात

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युवा शेतकरी नेते रविराज साबळे पाटील यांनीही छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा निश्चिय केला आहे. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. समाजमाध्यमावर एक पोस्ट करत त्यांनी राजकारणात उतरणार असल्याचे जाहीर केले. राजकारणात उतरूनच परिस्थितीत बदल घडवावा लागतो असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे.

रविराज साबळे हे धाराशिवमधील भूम तालुक्यातील तरुण कृषी उद्योजक आहेत. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन त्यांनी लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आता पदवीधर मतदारसंघातही ते अभिनव प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us