अजित पवारांना महायुतीत…; रोहित पवारांनंतर संजय राऊतांनी टाकला नवा बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ

रोहित पवारांनंतर संजय राऊतांनी आरोपाचा नवा बॉम्ब टाकला आहे. संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावरून अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

अजित पवारांना महायुतीत...; रोहित पवारांनंतर संजय राऊतांनी टाकला नवा बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ
sanjay raut on ajit pawar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 11:33 AM

आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मफलरमॅन म्हणत अजितदादा अपघात प्रकरणातील आरोपींना वाचवत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. रोहित पवारांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह परिषदेतील अजितदादांच्या पुतळा अनावरणाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांसाठी इतका उमाळा दाटून आला होता. परंतु या प्रकरणात एफआयआर दाखल का करण्यात आली नाही? अजित पवार महायुती आले नाहीत. तर त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं. अमित शहा यांच्याकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. संजय राऊतांनी नवा बॉम्ब टाकत खळबळ उडवली आहे.

संजय राऊत म्हणाले, तपासाची फाईल दाबता. अमित शहा काय करतात, त्यांनी जिंवतपणी सीबीआय, ईडी मागे लावण्यास वापरली का? अजित पवारांच्या अपघाताचा तपास करण्यासाठी सीबीआय नाही. मफलरमॅनचं कोडं त्यांनी सोडवलं. ज्या विमान कंपनीच्या मालकाचं विमान हे अजित पवारांनी वापरलं. त्यात काहीतरी गडबड होती. त्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पदर घेतल्यासारखं मफलर घेऊन मुख्यमंत्री हसत हसत जातात. रोहित पवारांनी धाडसानं दाखवलं. मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केलं पाहिजे. एफआयआर दाखल केला. योग्यरितीने तपास केला असता. तर त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण नव्हतं. अजितदादांच्या रहस्यमय मृत्यूमागे सूत्र आणि पात्र आहेत, त्यांना वाचवण्याचं काम करत आहे. अशा प्रकारे मफलरमॅन रोहित पवारांनी दाखवला. दादांच्या नावाने कालचे उमाळे खोटे होते. या सर्वांनी अजितदादांना पक्ष सोडण्यासाठी कोंडी केली. त्यांच्यावर खोटे आरोप केले. अमित शहा यांनी व्यासपीठावरून माफी मागितली पाहिजे होती’.

Loading...

‘अजितदादांवरील आरोप करण्यात आले होते. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अमुक घोटाळा तमुक घोटाळा…काल माफी मागायला पाहिजे होते. दादाला अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं. दादांवर अटकेची टांगती तलवार ठेवली.  अमित शहा, फडणवीस कोणी तुमचे मित्र नाहीत. कोणी तुमच्याशी नाते ठेवत नाही. स्वार्थी आहात. तुमचं नातं जमीनदार, बिल्डर आणि भ्रष्टचारांशी आहे. तुमचा नातेवाईक हे गौतम अदानी आहेत.  अहवालावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला नाही. काल तुम्हाला हुंदके आले होते. छाती भरून आली होती. घसा  कोरडा झाला होता. राज्याचे गृहमंत्री फालतू गोष्टीवर एफआयआर करायला सांगता. या प्रकरणात हात आखडता घेतला. अजितदादा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपी मोकाट सोडले आहेत. गृहमंत्र्यांचं काय करायचं? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us