मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीमध्ये जागांचा तिढा कायम, थेट..
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता मोठी अपडेट आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आता काही तासच शिल्लक आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये जागांवर अजूनही तिढा कायम आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट मंत्री गिरीश महाजन यांना फोन केला. काही तास अर्ज माघारी घेण्यासाठी उरलेली असताना मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीला एक जागा देऊन सर्व अर्ज मागे घ्यायला लावण्याचा मोठा गेम आहे. त्यातच रक्षा खडसेही मैदानात उतरल्या आहेत. शिवसेना शिंदे गट वरचढ ठरताना दिसत आहे. मात्र, राज्यात युतीत असलेल्या नेत्यांमध्ये जिल्हा बँकेत सुर जुळताना दिसत नाहीत. अर्ज माघारी घेण्यासाठी काही तास शिल्लक असताना युतीमधील तिढा कायम आहे. आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक व राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत.
एक जागा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सर्व ठिकाणी माघारी घेण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला. निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केली जात आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहेत.
महायुतीच्या पाच बैठका मात्र जागांचा तिढा कायम कायम आहे. मुक्ताईनगर आणि चोपड्याच्या जागेवरून टेन्शन वाढले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, रक्षा खडसे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच गिरीश महाजन यांना मार्ग मोकळा आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची माघार करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांची कसोटी सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत बैठकांचे सत्र रंगताना दिसले. काही तासातच स्पष्ट होईल की, निवडणूक बिनविरोध होणार की नाही. या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा आहेत. रक्षा खडसे यांच्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी काही तास शिल्लक असताना घडामोडी घडत आहेत.
