AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सदावर्तेंकडून राऊतांची नक्कल! ‘नो क्वेशन आन्सर’वर म्हणाले, लाज वाटायली काय?

मुद्दा एसटी विलीकरणाच्या सुनावणीचा तिथेही संजय राऊत चर्चेत आले. कारण एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची थेट नक्कल केली.

Video | सदावर्तेंकडून राऊतांची नक्कल! 'नो क्वेशन आन्सर'वर म्हणाले, लाज वाटायली काय?
सदावर्तेंकडून राऊतांची नक्कल
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 6:01 PM
Share

मुंबई : आज सर्वांचा फोकस एसटीच्या (St Worker) अहवालाच्या सुनावणीवर होती. कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. रोज चर्चेत असणारे संजय राऊत (Sanjay Raut) आज थोडे आऊट ऑफ फोकस झालेत की काय असे वाटत होतं. मात्र मुद्दा एसटी विलीकरणाच्या सुनावणीचा तिथेही संजय राऊत चर्चेत आले. कारण एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची थेट नक्कल केली. त्यामुळे या नकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागला आहे.आता तुम्ही म्हणत असाल या व्हिडिओत असे काय आहे की व्हायरल व्हायला लागला. तर व्हिडिओ संजय राऊतांच्या नो क्वेशन-आन्सर स्टाईलचा आहे. संजय राऊतांनी घेतलेल्या वादळी पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टिकेची बाण सोडले. मात्र शेवटी पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत नो क्वेशन, अन्सर म्हणताना दिसून आले.

सदावर्तेंच्या व्हिडिओत नेमकं काय?

संजय राऊत फक्त एकदाच नो क्वेशन-अन्सर नाही म्हणाले. त्यानंतर राऊतांनी जणू तसा पायंडाच पाडला. उद्धव ठाकरे आणि सीकेआर यांच्या हायव्होल्टेज पत्रकार परिषदेतही संजय राऊत पुन्हा सीकेआर यांच्या कानात पुन्हा नो कमेंट्स म्हणताना दिसून आले. आणि त्यावरून सदावर्ते यांनी संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे. ज्या सीकेआर यांची भेट घेतली त्यांच्या राज्यात काय सवलती दिल्या आहेत, हे विचारायला हवं होतं. तेव्हा विचारायला काय झालं होतं? तेव्हा विचारायला लाज वाटत होती का? असा आक्रमक सवाल एकदा नाही तीनवेळा या व्हिडिओत करताना दिसून येत आहेत. त्यामुळे संजय राऊत आज पुन्हा या नक्कलीने चर्चेत आले आहेत.

पाहा हटके स्टाईल सदावर्ते

सुरूवातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मैदानात उतले मात्र ते बाजूला झाल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी हे आंदोलन टेकओव्हर केलंय. तेव्हापासून ते रोज सरकारवर तोफा डागत आहेत. यात सदावर्तेंनी केलेली नक्कल एवढी हटके स्टाईल आहे, तुम्हीही एवढ्या तणावात खदखदून हसाल. आज दिवसभर एसटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची बोलण्याची स्टाईल पहिल्यापासूनच आक्रमक आहे. बोलताना त्यांच्या आवाजाची पट्टीही बरीच वरची असते. वाक्यातील शब्दांवर एक विशिष्ठ भर असतो. मात्र आज केलेली ही नक्कल आणि ते हटके स्टाईल हातवारे अनेक दिवस अनेकांच्या लक्षात राहतील एवढं मात्र नक्की.

St Worker : एसटी अहवालावर कोर्टात काय झालं? सदावर्ते आणि सरकारी वकिलांमध्ये काय युक्तीवाद?

उपमहापौरपद मिळताच काँग्रेसमध्ये परतणार नाही म्हणणारे नगरसेवक सतीश होले यांची घरवापसी! नागपुरात नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश

एसटी विलीनीकरणाचा मुद्दा धोरणात्मक, निर्णयाला वेळ लागणार-अनिल परब

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.