एसटी विलीनीकरणाचा मुद्दा धोरणात्मक, निर्णयाला वेळ लागणार-अनिल परब

उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा निर्णय हा वाचण्यात आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयाचे पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

एसटी विलीनीकरणाचा मुद्दा धोरणात्मक, निर्णयाला वेळ लागणार-अनिल परब
एसटी कामगारांना विलीनिकरण सदृश्य लाभ मिळणार?; अनिल परब करणार उद्या घोषणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:38 PM

मुंबई : आज पुन्हा एसटीच्या विलीकरणाच्या (St Merger) सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आजही एसटी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा (St Worker Strike) मुद्दा तापला आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा निर्णय हा वाचण्यात आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयाचे पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला आम्ही 50 लाख रुपये दिले आहे आणि जे नियमात बसणार नव्हते त्यांना देखील आम्ही 5 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की कामावर तुम्ही या आम्ही कामावर तुम्हांला घेण्यासाठी तयार आहोत, अशी साद अनिल परबांनी घातली आहे.

खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, लोकांचे हाल थांबवा आणि कामावर या हे आवाहन आम्ही वारंवार करत आहोत, एसटी विलानीकरन चा निर्णय हा धोरणात्मक आहे. आणि काही वृत्तपत्रांनी ही खोडसाळ बातमी दिली आहे की कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात होणार आहे म्हणून पण ही गोष्ट चुकीची आहे. असेही स्पष्टीकरण यावेळी परबांनी दिले आहे. संपात एसटीचे नुकसान प्रचंड झालं आहे, पण असा कोणताच निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घाबरू नये असे परब म्हणाले. तसेच एसटीचा अहवाल मी वाचला नाही. त्यामुळे त्यावर मुख्यमंत्र्यांची सही आहे की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही, असेही परबांनी सांगितले.

पुन्हा तारीख पे तारीख

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 109 दिवस विलीनीकरणासाठी संप  पुकारला होता. सुरूवातील आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं.

एसटी कर्मचाऱ्यांना भाजपनं उचकावलं आणि साथ सोडली, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख

अमिर खानच्या ‘सोयाबीन शाळेत’ महाराष्ट्रातील शेतकरी होणार का पास? नेमका उद्देश काय?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.