अमिर खानच्या ‘सोयाबीन शाळेत’ महाराष्ट्रातील शेतकरी होणार का पास? नेमका उद्देश काय?

सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे. काळाच्या ओघात सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली पण उत्पादनात नाही ही वस्तूस्थिती आहे. आजही सोयाबीनचा उतारा एकरी 5 ते 6 क्विंटल एवढाच आहे. सर्वात अधिकच्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या पिकाची ही अवस्था का? वाढीव उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही म्हणून उत्पादन वाढीबाबात आता अभिनेता अमिर खान यांची टीम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा घेतली आहे. दर रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन केले जात होते.

अमिर खानच्या 'सोयाबीन शाळेत' महाराष्ट्रातील शेतकरी होणार का पास? नेमका उद्देश काय?
सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी पाणी फाऊंडेशन लिखित पुस्तकाचे प्रकाशन राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 4:29 PM

मुंबई: सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य पीक आहे. काळाच्या ओघात (Soybean Area) सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली पण उत्पादनात नाही ही वस्तूस्थिती आहे. आजही (Soybean Production) सोयाबीनचा उतारा एकरी 5 ते 6 क्विंटल एवढाच आहे. सर्वात अधिकच्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या पिकाची ही अवस्था का? वाढीव उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही म्हणून उत्पादन वाढीबाबात आता अभिनेता अमिर खान यांची टीम (Maharashtra) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा घेतली आहे. दर रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन केले जात होते. याच अनुशंगाने अभिनेता अमिर खान याने राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. शिवाय या दरम्यान, पाणी फाऊंडेशन सोयाबीन उत्पादन वाढीबाबत तयार केलेल्या पुस्तिकेचेही ऑनलाईनद्वारे प्रकाशन केले आहे. त्यामुळे जे कृषी विभागाला जमले नाही ते पाणी फाऊंडेशन करुन दाखवणार का? हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

पाणी फाऊंडेशनच्या अजेंड्यावर सोयाबीन पीक

आतापर्यंत महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. दरम्यानच, या टीमच्या निदर्शनास आले की सोयाबीनचे हे मुख्य पीक असूनही त्याची उत्पादकता कशी नाही? त्याच अनुशंगाने राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा आणि प्रत्यक्ष बांधावरची स्थिती काय आहे पाहून या पाणी फाऊंडेशनच्यावतीने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ज्याचा वापर आता सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे.

दर रविवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सोयाबीनचे क्षेत्रच नाही तर उत्पादकता वाढावी यादृष्टीने अभिनेता अमिर खानची टीम राज्यात काम करत होती. शेतकऱ्यांना दर रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातून सोयाबीन शेतीचे धडे दिले गेले आहेत आहेत. त्याअनुशंगाने राज्यातील 50 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असल्याचे अमिर खान यांनी सांगितले आहे. शिवाय या मार्गदर्शना दरम्यान, शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते योग्य बाजारपेठ इथपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले होते. वर्षभरात सोयाबीनचे उत्पादन वाढवावे कसे याबाबत एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून आगामी काळात दुसरे पीक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

सोयाबीन पुस्तकाचे प्रकाशन

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवरच अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करायची कशी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्यास उपयोगी पडेल असे हे पुस्तक असून राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

संबंधित बातम्या :

विक्री की साठवणूक..! सोयाबीनची वाटचाल 7 हजाराच्या दिशेने, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला ?

शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी, शेतकरीद्रोही सरकारविरोधात आंदोलन करणार, सदाभाऊ खोत FRP वरुन आक्रमक

खरीप हंगाम : नुकसानीचा उर्वरीत निधीही जिल्ह्यांकडे वर्ग, आता नेमकी प्रक्रिया काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.