AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किशोरी पेडणेकरांना मोठा धक्का, मुंबई महापालिकेत ठाकरेंची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीतून किशोरी पेडणेकर यांना वगळल्यावरून मनसे नेते संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठा गटावर जोरदार टीका केली असून, याला प्रशासकीय अज्ञान आणि अंतर्गत राजकारण असल्याचे म्हटले आहे.

किशोरी पेडणेकरांना मोठा धक्का, मुंबई महापालिकेत ठाकरेंची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
Kishori Pednekar
| Updated on: Feb 17, 2026 | 1:27 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समित्यांच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीपासून दूर ठेवले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता भाजप नेते संतोष धुरी यांनी याप्रकरणी टीका केली आहे. हा मातोश्रीचा प्लॅन आहे की अज्ञान, हे आता स्पष्ट झाले असून किशोरी ताईंचा केसाने गळा कापला गेला आहे, असे खळबळजनक वक्तव्य संतोष धुरी यांनी केले आहे.

नेमका प्रकार काय?

सोमवारी मुंबई महानगरपालिका सभागृहात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. नियमानुसार, विरोधी पक्षनेता हा ‘एक्स-ऑफिसिओ’ (पदसिद्ध) सदस्य म्हणून स्थायी समितीत जातो. मात्र, ठाकरे गटाने महापौरांकडे दिलेल्या नावांच्या यादीत किशोरी पेडणेकर यांचा नावाचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीचे सदस्यत्व मिळालेले नाही.

मुद्दाम समित्यांपासून लांब ठेवले

आता यावर संतोष धुरी यांनी जोरदार टीका करत उद्धव ठाकरे यांचे उपरोधिक अभिनंदन केले आहे. मी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करतो की त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा ईडीची चौकशी सुरू आहे, अशा नेत्यांना त्यांनी मुद्दाम समित्यांपासून लांब ठेवले असावे, असे संतोष धुरी म्हणाले.

ठाकरे गटाच्या नेत्यांना असे वाटते की त्यांना सर्व समजते, पण प्रत्यक्षात त्यांना प्रशासकीय कामाचे शून्य ज्ञान आहे. विरोधी पक्षनेता हा आपोआप स्थायी समितीत जातो, हे त्यांना ठाऊक नव्हते. मातोश्रीवरून सांगण्यात आले की तुमचे नाव देऊ नका आणि त्यांनी ते मान्य केले. हा निव्वळ मूर्खपणा आहे, असेही संतोष धुरी यांनी म्हटले.

यावर किशोरी पेडणेकर नक्कीच नाराज असणार आहे. तुमचा केसांनी गळा कापला आहे. त्यांच्याकडे फक्त सभागृहापुरतेच पद उरले आहे. प्रत्येक समितीवर विशिष्ट गॉडफादरमुळे त्यांची वर्णी लागत होती, पण आता इतर वरिष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे मातोश्रीला समजले आहे, असेही संतोष धुरी म्हणाले.

इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याचे नाव स्थायी समितीत नाही

दरम्यान शिवसेना ठाकरे गटनेत्या किशोरी पेडणेकर असूनही त्यांचे नाव कोणत्याही समितीत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याचे नाव स्थायी समितीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. या सर्व घडामोडींमुळे किशोरी पेडणेकर यांचे पक्षात आणि पालिकेत असलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल