AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Committees : कोणाकडे तिजोरीची चावी? तर कोणाला बक्षीस? मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा डंका, संपूर्ण यादी समोर

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी, शिक्षण आणि सुधार समिती सदस्यांची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली असून यामध्ये मकरंद नार्वेकर, अंकित प्रभू यांसारख्या नेत्यांच्या नातेवाईकांना संधी मिळाली आहे.

BMC Committees : कोणाकडे तिजोरीची चावी? तर कोणाला बक्षीस? मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा डंका, संपूर्ण यादी समोर
BMC
| Updated on: Feb 17, 2026 | 10:45 AM
Share

मुंबई महापालिकेत महापौर विराजमान झाल्यानंतर आता विविध समित्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या लोकप्रतिनिधींच्या हातात आल्या आहेत. त्यामुळे महापौर रितू तावडे यांनी सोमवारी विशेष सभेत महापालिकेच्या चार अत्यंत महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली. यात स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमध्ये राजकीय घराणेशाही आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांना झुकते माप देण्यात आल्याचे बोललं जात आहे.

स्थायी समितीवर दिग्गजांच्या भावंडांची वर्णी

महापालिकेची सर्वात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांमुळे ही स्थायी समिती चर्चेत आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना भाजपने स्थायी समितीवर संधी दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांनाही या समितीचे सदस्यत्व देऊन भाजपने नवा राजकीय समतोल साधला आहे.

शिक्षण आणि सुधार समितीवर तरुण चेहऱ्यांना संधी

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांची शिक्षण समितीवर निवड झाली आहे. तसेच महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांचीही निवड शिक्षण समितीवर करण्यात आली आहे. नामनिर्देशित सदस्य म्हणून खासदार संजय राऊत यांचे पुतणे प्रियांक संदीप राऊत यांना संधी मिळाली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर आणि राष्ट्रवादीतून आलेले चंदन शर्मा यांना सुधार समितीवर पाठवून पक्षाने बक्षिसी दिली आहे. शरद पवार गटाचे अजित रावराणे यांनाही येथे स्थान मिळाले आहे.

बेस्ट समितीमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या अधिक आहे. शिवसेना ठाकरे गटाने आमदार सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर यांना संधी दिली आहे. मनसेतून ठाकरे गटात आलेले नितीन नांदगावकर यांचीही वर्णी बेस्ट समितीवर लागली आहे. या नियुक्त्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या (अजित पवार आणि शरद पवार) नगरसेवकांना सामावून घेण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या डॉ. सईदा खान यांना स्थायी समितीवर पाठवून भाजपने सत्तेतील मित्रपक्षाला महत्त्वाचा वाटा दिला आहे.

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल