AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी गावी गेले, पेस्ट कंट्रोलसाठी बहिणीकडे चावी दिली, पण घराचा दरवाजा उघडताच… डोंबिवलीत काय घडलं?

डोंबिवलीच्या देसलेपाडा परिसरात खळबळजनक घरफोडीची घटना घडली आहे. लग्नासाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी ४० तोळे सोने आणि ५० हजारांची रोकड लांबवली असून मानपाडा पोलीस तपास करत आहेत.

लग्नासाठी गावी गेले, पेस्ट कंट्रोलसाठी बहिणीकडे चावी दिली, पण घराचा दरवाजा उघडताच... डोंबिवलीत काय घडलं?
Dombivli theft
| Updated on: Feb 17, 2026 | 10:13 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आता चोरट्यांनी भरवस्तीतील बंद घरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. देसलेपाडा परिसरातील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या बंद घर फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा येथील आर.पी. रेसीडेन्सीमध्ये अशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ते त्यांच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी एका लग्नसमारंभासाठी सहकुटुंब गेले होते. यावेळी घराच्या सुरक्षेसाठी त्यांनी घराची चावी आपली बहीण मायादेवी (रा. सोनारपाडा) यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या घरात ९ फेब्रुवारीला पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करण्यात आले होते.

यानंतर १५ फेब्रुवारी रोजी घराच्या वॉटर फिल्टरची दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ येणार होता. त्यासाठी मायादेवी आणि त्यांचे पती दुपारी १ च्या सुमारास अशिष यांच्या घरी गेले. यावेळी त्यांना घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेली अवस्थेत दिसली. त्यांनी आत प्रवेश केला असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी होती. तसेच लॉकर तोडलेले होते. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते.

या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या बहिणीने अशिष यादव यांना याबद्दलची माहिती दिली. प्राथमिक अंदाजानुसार, कपाटात ठेवलेले साधारण ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

घरफोडीचा गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आता लग्नसराई आणि सुट्ट्यांच्या काळात घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी अतिरिक्त सुरक्षा बाळगावी. तसेच मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.