AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष पंडित यांनी हात जोडले, मोबाइल, बेल्ट काढून कुटुंबीयांना दिला; पोलीस मध्यरात्री घरी धडकल्यानंतर नेमकं काय घडलं?

संतोष पंडित यांनी अटकेनंतर हात जोडले, मोबाइल, बेल्ट काढून कुटुंबीयांना दिला. पोलिसांनी मध्यरात्री घरी धाड टाक संतोष पंडित यांना अटक केली.

संतोष पंडित यांनी हात जोडले, मोबाइल, बेल्ट काढून कुटुंबीयांना दिला; पोलीस मध्यरात्री घरी धडकल्यानंतर नेमकं काय घडलं?
santosh pandit news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 10:16 AM
Share

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्याकडून सातत्याने पुण्यातील विकासकामांवर टीका केली जात आहे. पंडित यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करून कामकाजावर टीका केली जात आहे. परंतु याच टीकेमुळे संतोष पंडित अडचणीत सापडले. संतोष पंडित यांना पुण्यातील राहत्या घरातून अटक केली. त्यांच्यावर युट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करताना हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

संतोष पंडित यांना अटक करण्यासाठी पोलीस हे सिव्हिल ड्रेसमध्ये आले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ शूट केला. पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उचलला. संतोष पंडित म्हणाले, ‘पोलीस रात्री साडेबारा वाजता आमच्या घरात घुसतात. हीच आमच्यासारख्यांची लायक आहे. माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल, सहकार्य करत नसेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद’. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतोष पंडि यांनी त्यांचा मोबाईल, गाडीची किल्ली, बेल्ट कुटुंबीयांना दिला. पोलिसांना या गोष्टी गरज नसल्याचे त्यांनी म्हटलं. आता त्यांचा अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संतोष पंडित यांच्यावर काय आहेत आरोप?

संतोष पंडित हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहे. ते सातत्याने पुणे महापालिकेच्या विकासकामे आणि त्रुटीविषयी व्हिडिओ पोस्ट करून टीका करत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवीगाळ कर व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर मंत्र्‍यांची बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनीही संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. लोकप्रतिनिधी जनसामान्यांचे प्रश्न न सोडवता बगल देण्याचे काम करतात, अशा आशयाची टीका त्यांनी केली होती. त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता संतोष पंडित यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,