कराड नगरपालिका कंगाल, कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी आकारणार पैसे

कराडमध्ये मृत कोरोना रुग्णाचा अंत्यसंस्कार करायचा असेल तर दहनासाठी पाच आणि दफनविधीसाठी दहा हजार रुपये आकारले जाणार आहेत.(Karad Municipality will now charge for the funeral of the corona patients)

कराड नगरपालिका कंगाल, कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी आकारणार पैसे

सातारा : कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी कराड नगरपालिका (Karad Municipality) आता पैसे आकारणार आहे. मृत कोरोना रुग्णाचा अंत्यसंस्कार करायचा असेल तर दहनासाठी 5500 आणि दफनविधीसाठी 10 हजार रुपये कराड नगरपालिका आकारणार आहे. तिजोरीत पैसेच नसल्याने ‘दर ठरवण्या’ची वेळ आली नगरपालिकेवर आल्याचे सांगितले जात आहे. (Karad Municipality will now charge for the funeral of the corona patients)

आतापर्यंत कराड तालुक्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,986 वर पोहोचला आहे, तर एकूण 276 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कराड शहरात परिस्थिती एवढी गंभीर नसली तरी आतापर्यंत 1489 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगरपालिकेची आहे. त्यासाठी नगरपालिकेने आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. पण यानंतर अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले. त्यामुळे मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च यापुढे त्यांच्या नातेवाईकांनाच उचलावा लागणार आहे. तसा ठरावही नगरपालिकेने मंजूर केल्याची माहिती नगरपालिका गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

राजेंद्र यादव यांनी सांगितले, की “आतापर्यंत नगरपालिकेच्या निधीतूनच मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले गेले. पण यानंतर आता कराड पालिका दहनविधिसाठी 5500 तर दफनविधीसाठी 10000 रुपये घेणार आहे”

दरम्यान, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 36,816 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 27,458 जण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत 937 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमुळे होत्या त्या नोकऱ्या हातच्या गेल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. अशातच कोरोनोमुळे मृत्यू झाल्यानंतर अत्यसंस्काराचा खर्च स्व:तच करावा लागत असल्याने नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब पाटलांना कोरोनाची लागण, कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु

कोरोनावरील लस संशोधनात कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

(Karad Municipality will now charge for the funeral of the corona patients)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *