शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीलाही उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते.

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली
Follow us
| Updated on: Aug 09, 2020 | 12:12 PM

कराड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कराडमध्ये होत असलेल्या कोरोना आढावा बैठकीला साताऱ्यातील दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले गैरहजर आहेत. पवारांच्या उपस्थितीतील बैठकीला उदयनराजेंनी दुसऱ्यांदा टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. (BJP MP Udayanraje Bhosle skips Corona Review Meeting in Karad Satara in presence of Sharad Pawar)

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे. शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीसाठी गेस्ट हाऊसवरुन निघाले, त्यावेळी भाजप आमदार शिवेंद्रराजेही त्यांच्यासोबत होते. तर गृहराज्यमंत्री आणि पाटणचे शिवसेना आमदार शंभुराज देसाई, कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिकही हजर आहेत.

मुंबईत असल्याने माजी मुख्यमंत्री आणि कराडचे काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. तर साताऱ्यात मोठे प्रस्थ असलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसलेही गैरहजर आहेत. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीलाही उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची त्यांची शरद पवार यांच्यासोबत ही पहिलीच बैठक ठरली असती.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

उदयनराजे भोसले यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचा झेंडा हाती धरला होता. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, परंतु पक्ष बदलणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना संसदेत पाठवलं. उदयनराजे भोसलेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला. (BJP MP Udayanraje Bhosle skips Corona Review Meeting in Karad Satara in presence of Sharad Pawar)

कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेत बैठक 

कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये ही बैठक होत आहे. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत कोरोनासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. संभाव्य पाऊस, धरणसाठा, स्थलांतर सुरु असलेल्या नागरिकांसाठीच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे लागोपाठ दोन दौऱ्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणखी मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही बोललं जात आहे.

(BJP MP Udayanraje Bhosle skips Corona Review Meeting in Karad Satara in presence of Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.