शरद पवारांचा झंझावाती दौरा, कराडमध्ये कोरोना आढावा बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (9 ऑगस्ट) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत (Sharad Pawar Rajesh Tope visit Satara).

शरद पवारांचा झंझावाती दौरा, कराडमध्ये कोरोना आढावा बैठक

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (9 ऑगस्ट) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत (Sharad Pawar Rajesh Tope visit Satara). सकाळी 11 वाजता कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉलमध्ये ही बैठक पार पडेल. या बैठकीत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे.

राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत कोरोनासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूर परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. संभाव्य पाऊस, धरणसाठा, स्थलांतर सुरु असलेल्या नागरिकांसाठीच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

शरद पवारांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला खासदार छत्रपती उदयनराजे हे देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले नव्हते. खासदार झाल्यानंतर उदयनराजे या बैठकीला हजेरी लावतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. उदयनराजे यांनी हजेरी लावली, तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची त्यांची शरद पवार यांच्यासोबतची ही पहिलीच बैठक ठरणार आहे. यापूर्वी आढावा बैठकीत आमदार शिवेंद्रराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन अनेक मागण्या केल्या होत्या.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

विशेष म्हणजे आज माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातील आढावा बैठकही पार पडत आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण मुंबईत असल्याने या बैठकीला हजर राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले आहे. मात्र, त्यानंतरही राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या कोरोना लढ्यात स्वतःला झोकून दिलं आहे.

शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे लागोपाठ दोन दौऱ्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणखी मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा :

काही विद्यार्थ्यी फी भरु शकले नाही, पुणे विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांंचे संपूर्ण निकालच अडवले

मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर

Sharad Pawar Rajesh Tope visit Satara

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *