मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला (Pravin Darekar corruption charges on BMC).

मुंबई महापालिका दलालांमार्फत पैसे उकळत आहे, भाजप पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Aug 08, 2020 | 6:25 PM

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला (Pravin Darekar corruption charges on BMC). यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर टीका केली. प्रवीण दरेकर यांनी आज (8 ऑगस्ट) मुलुंड पश्चिम आयबीएस रोड येथील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, “जम्बो कोविड सेंटरचं 7 जुलैला उद्घाटन झालं, परंतु अजून देखील येथे आयसीयू कक्ष नाहीत. एजन्सीमार्फत लूटमार सुरु आहे. या एजन्सीने 10 पट पैसे आकारण्याचे काम केले आहे. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. 100 बेड असतील, तर 400 बेडची बिलं लावली जात आहेत. मुंबई महापालिका दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळत आहे. भाजप याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबईकरांचे अवाजवी पैसे जाणार नाहीत. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील अनेक प्रश्न आहेत.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“वराती मागून घोडे नाचवण्यात अर्थ नाही, शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका नाही”

“वराती मागून घोडे नाचवण्यात काही अर्थ नाही. 90 टक्के कोकणवासीय हे अर्धे कोकणात पोहचले आहेत. अजूनपर्यंत बसेसची बुकिंग नाही. ते 14 दिवस क्वारंटाईनचा त्रास भोगत आहे. शिवसेनेसाठी मुंबईच्या चाकरमान्यांचे योगदान मोठे होते. त्याच चाकरमान्यांना शिवसेनेचे नेते विनायक राऊत येऊ नका म्हणून सांगतात. शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका आला नाही. मी दौरा केल्यानंतर राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मदत झाली आहे,” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात कोरोना चाचणी केंद्र उभं करणार

प्रवीण दरेकरांनी यावेळी कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात सव्वा कोटी रुपयांचे एक मोठे कोरोना चाचणी केंद्र उभं करणार असल्याची घोषणा केली. कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात लवकरच चाचणी केंद्र सुरु करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या यांचं उद्घाटन करणार आहे, असं ते म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“मराठा आरक्षणाबाबत सरकार तोंडाला पानं पुसण्याचं काम करतंय”

प्रवीण दरेकर म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पूर्णपणे तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात त्या ठिकाणी आमची सर्व तयारी आहे आणि वकील कोर्टात सांगतात की आम्हाला कागदपत्रं मिळालेली नाहीत. याचा अर्थ यांना किती आस्था आणि संवेदनशीलता आहे हे यातून दिसते.” यावेळी दरेकरांनी जनता हैराण झाली आहे असं सांगितलं. तसेच वीज बिलाबाबत सरकाने सूट द्यावी आणि जास्त प्रमाणातील वीज बिलं माफ करावी, अशी मागणी केली.

हेही वाचा :

Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर

Konkan Ganeshotsav | रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

Pravin Darekar corruption charges on BMC

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.