Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात (Opposition Allegations on Konkan Ganeshotsav) आहेत.

Namrata Patil

|

Aug 03, 2020 | 11:24 PM

सिंधुदुर्ग : कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात आहेत. मात्र त्या ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे. तर उत्तर भारतीयांना बस आणि ट्रेन, मग कोकणावासियांना का नाही?, असा सवाल विरोधकांनी केला आहे. (Opposition Allegations on Konkan Ganeshotsav)

अनेक चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे निघाले आहे. मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांच्या आवाहनावर भाजप आणि मनसेनं आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यकता आहे त्यांनीच यावं, बाकीच्यांनी येऊ नये असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

यावरुनच आता भाजपनं सवाल उपस्थित केला आहे. कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केले आहेत.

एसटी बसद्वारे चाकरमान्यांना कोकणात आणू, असं परिवहन मंत्री अनिल परब वारंवार म्हणाले आहेत. मात्र चाकरमान्यांसाठी तशी सोय काही झाली नाही. त्यामुळे ई-पास काढून चाकरमानी कोकणात येत आहेत. मात्र ई-पासमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या हातावर क्वॉंरटाईनचा शिक्का मारुन प्रवेश दिला जात आहे. चाकरमान्यामुळं कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून 14 दिवस क्वॉरंटाईनची अट ग्रामपंचायतींनी ठेवली आहे. त्यामुळं गावातील शाळांमध्ये या चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यात येतं आहे.

पुढील 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी लक्षात घेऊन हजारो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे ई पासमधून लूट होणार नाही, एवढी काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे अनेकांचे म्हणणं आहे. (Opposition Allegations on Konkan Ganeshotsav)

संबंधित बातम्या : 

Konkan Ganeshotsav | रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

Nashik Corona | नाशिकमध्ये संचारबंदीतही नागरिक बेफिकीर, दोन कोटींचा दंड, 17 हजार नागरिकांवर कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें