मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

खासदार उदयनराजे भोसले यांच्या अडचणी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. उदयनराजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 11:56 PM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यात आज खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मोठा वाद उफाळला होता. उदयनराजे यांनी शिंवेंद्रराजे यांचा कार्यक्रम उधळून लावला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अखेर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्या फिर्यादीनंतर उदयनराजे भोसले यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 141,143,149, 506, 427 अंतर्गत गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 35 ओळखीचे आणि 15 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वादावर नियंत्रण मिळवण्यात आला होता. खिंडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी हा वाद उफाळला होता.

हे सुद्धा वाचा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन हे शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडणार होतं. यासाठी खिंडवाडी येथे मोठी तयारी करण्याक आली होती. शिवेंद्रराजे यांच्यासाठी कंटेनर ऑफिसची देखील व्यवस्था करण्यात आली होती. पण जिथे बाजारपेठच्या नव्या कार्यालयाचं भूमीपूजन होणार होतं ती जमीन उदयनराजे यांची असल्याचा दावा करण्यात आला. यावरुन हा वाद उफाळला.

भूमिपूजनाचा कार्यक्रम हा सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. पण कार्यक्रम सुरु होण्याआधी उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होतं राडा केला. त्यांनी शिंवेद्रराजे भोसले यांचं कंटेनर ऑफिस उधळून लावले. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी पोलिसांमुळे मोठा वाद टळला. या घडामोडींनंतर पोलिसांच्या सुरक्षेत शिवेंद्रराजे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सातत्याने वाद सुरु असतात. कधी ते सातारा नगर पालिकेतील प्रश्नांवरुन एकमेकांवर टीका करतात. तर कधी इतर आणखी काही विषयांवर टीका केली जाते. ते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे दोन्ही नेते हे छत्रपती घराण्याचे वंशज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्यांच्याकडून अशा घडामोडी अपेक्षित नाहीत, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.