AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कँडलमध्ये नवीन Twist, पीडितेच्या सासूचा गौप्यस्फोट

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कँडल प्रकरणात एक नवीन वळण आलय. आरोप करणाऱ्या महिलेच्या सासूनेच तिच्यावर उलट गंभीर आरोप केले आहेत. तिने अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. पीडितेच्या सासूने अप्रत्यक्षपणे सुनेलाच चुकीच ठरवलं.

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कँडलमध्ये  नवीन Twist, पीडितेच्या सासूचा गौप्यस्फोट
prajwal revanna
| Updated on: Apr 30, 2024 | 8:03 AM
Share

खासदार प्रज्वल रेवन्नावर होत असलेले आरोप आणि पेन ड्राइव प्रकरणाला आता नवीन वळण लागलय. एचडी रेवन्ना आणि प्रज्वलवर आरोप करणाऱ्या महिलेवर तिच्या सासरकडचे नाराज आहेत. आरोप करणाऱ्या महिलेच्या सासूने हासनमध्ये मीडियाशी बोलताना एचडी रेवन्ना आणि प्रज्वलवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याच म्हटलं आहे. सोमवारी ही बाब समोर आली. भवानी अम्माने आमच्या कुटुंबाची भरपूर मदत केलीय, असं पीडितेची सासू म्हणाली. गौडा कुटुंबावर कलंक लावण्यासाठी ही तक्रार करण्यात आलीय. जे आरोप लावण्यात आलेत, ते खोटे आहेत. रेवन्नाच कुटुंब आणि आम्ही नातेवाईक आहोत. महिलेच्या सासूने सर्व आरोप फेटाळून लावलेत.

पीडितेच्या सासूने अप्रत्यक्षपणे सुनेलाच चुकीच ठरवलं. रेवन्नावर ज्या महिलेने आरोप केलेत, मी तिच्याविरोधात बोलतेय. आरोप करणारी महिला योग्य नाहीय. तिने खूप कर्ज घेतलं होतं. आपली जमीन विकली होती. एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबावर कलंक लावण्यासाठी, बदनाम करण्यासाठी तिने हा आरोप केला, असं पीडित महिलेच्या सासूच म्हणणं आहे. आमच्यामुळे कुठेही गौडा कुटुंबाच नाव खराब होऊ नये. ती महिला खोटं बोलतेय. गौडा कुटुंबाने काहीही चुकीच केलेलं नाही, हे आम्ही शपथेवर सांगायला तयार आहोत. भवानी अम्माने आम्हाला अडचणीत मदत केली. आमच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. तक्रार करणाऱ्या महिलेच वर्तन चांगलं नाहीय, तिच्याविरोधात कुठलाही हिंसाचार झालेला नाही असं पीडित महिलेच्या सासूने म्हटलय.

तक्रार करणारे पाच वर्ष काय करत होते?

तक्रार करणारे पाच वर्ष काय करत होते? आता का तक्रार करतेय? असं पीडितेच्या सासूने म्हटलं आहे. ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांनी आमची मदत केलीय. आमचं पालनपोषण केलं. तक्रार करणाऱ्यांची चूक आहे. गौडा कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलय. गौडा कुटुंब इतकी वर्ष राजकारणात आहे, त्यांच्यावर एकही डाग नाहीय असं पीडितेच्या सासूने म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.