AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्या रागामुळे इराण युद्धाशी ज्या देशाचं देणंघेणं सुद्धा नाही, त्याला फुकटमध्ये चुकवावी लागेल सर्वात मोठी किंमत

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात पिछेहाट होत असल्याने सध्या ट्रम्प यांचा पारा हाय आहे. या सगळ्यामध्ये इराण युद्धाशी ज्या देशाचं देणंघेणं सुद्धा नाही, अशा छोट्या देशाला फुकटमध्ये सर्वात मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

ट्रम्प यांच्या रागामुळे इराण युद्धाशी ज्या देशाचं देणंघेणं सुद्धा नाही, त्याला फुकटमध्ये चुकवावी लागेल सर्वात मोठी किंमत
Donald Trump
| Updated on: Mar 18, 2026 | 3:01 PM
Share

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील वाढत्या तणावाने फक्त तेल बाजाराच नाही, तर जागतिक राजकारणाला हलवून सोडलय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुज ओपन करण्यासाठी NATO देशांकडे मदत मागितली होती. पण त्यांनी या युद्धात पडायला नकार दिला. त्यामुळे ट्रम्प नाटो देशांवर प्रचंड खवळले आहेत. आता याचा थेट परिणाम युक्रेन युद्धावर होऊ शकतो. अमेरिका आणि युरोपमध्ये निर्माण झालेल्या या मतभेदांची किंमत युक्रेनला चुकवावी लागू शकते. ट्रम्प व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत डील करु शकतात अशी सुद्धा भिती आहे.

अमेरिकेने नाटो देश खासकरुन ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये वॉरशिप पाठवण्याची विनंती केली होती. पण बहुतांश युरोपियन देशांनी नकार दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “नाटो मोठी चूक करत आहे. अमेरिका त्यांची सुरक्षा करतो. पण ते साथ देत नाहीयत. हीच स्थिती राहिली तर नाटोचं भविष्य खराब होईल” अशी ट्रम्प यांनी धमकी दिली.

युक्रेनचं काय नुकसान होईल?

अमेरिकेकडून मिळणारी मदत कमी होऊ शकते. अमेरिकेने आधीच युक्रेनची सैन्य मदत कमी केली आहे. तणाव वाढला तर ही मिळणार मदत अजून कमी होऊ शकते.

ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणातंर्गत युक्रेनची सर्व जबाबदारी युरोपवर टाकली जात आहे. अनेक युरोपियन देश दबावाखाली आहेत. जनता सुद्धा या युद्धामुळे थकली आहे.

अमेरिकेने माघार घेतली आणि युरोपने पूर्णपणे साथ दिली नाही, तर रशियाला फायदा मिळू शकतो.

यामुळे शांतता निर्माण होईल, पण..

युद्धाचं सगळं संतुलन बदलून जाईल.

NATO मध्ये फूट पडल्यास युरोप एकजूट नाहीय हे रशियाला संकेत मिळतील.

त्यामुळे युक्रेनची स्थिती अजून कमकुवत होऊ शकते.

नाटो कमजोर झाल्यास युक्रेनला रशियाने ताब्यात घेतलेल्या भागांवरील दावा सोडावा लागू शकतो.

युक्रेनची नोटामधल्या समावेशाची योजना थांबू शकते.

रशियावरील प्रतिबंध कमी होऊ शकतात. त्यांना सवलत मिळेल. यामुळे शांतता निर्माण होईल. पण युक्रेनला याची सर्वात मोठी किंमत चुकवावी लागेल.

नाटोवर ट्रम्प यांची नाराजी फक्त एक वक्तव्य नाही, आता एक जागतिक मुद्दा बनली आहे. याचा थेट परिणाम युक्रेन युद्धावर होऊ शकतो. ट्रम्प आणि पुतिन यांच्यात काही डील झाल्यास युक्रेनचं सैन्य आणि राजकीय नुकसान होईल.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...