AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्याची ‘चक दे इंडिया’ | ऊसतोड मजुराची मुलगी खेळणार जर्मनीत हॉकी, तिच्या यशामागे हे 2 शिक्षक

काजलचा भावंडात पाचवा नंबर, ऊस तोडणीसाठी सहा महिने जावे लागत असल्याने काजलची शाळा बुडु लागली, तेव्हा शिक्षिकेनी जबाबदारी घेतली.

साताऱ्याची 'चक दे इंडिया' | ऊसतोड मजुराची मुलगी खेळणार जर्मनीत हॉकी, तिच्या यशामागे हे 2 शिक्षक
kajal Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 11, 2023 | 7:39 PM
Share

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : सहा महिने ऊसतोडणी तर सहा महिने मातीकाम करुन कुटुंबाचं पोट कसंतरी भरायचं असे अस्थिर आयुष्य. पदरी पाच मुली आणि दोन मुलांना सांभाळायचं अवघड आव्हान, जिथे पोटभरण्याची भ्रांत तेथे मुलांना शिकवायचं कसं याचं टेन्शन अशा वातावरणात सातारा येथील दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी या गावात राहणाऱ्या सदाशिव आटपाटीकर यांच्या लेकीची जर्मनीतील चार राष्ट्रांच्या हॉकीस्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

काजलचा भावंडात पाचवा नंबर, ऊस तोडणीसाठी सहा महिने जावे लागत असल्याने काजलची शाळा बुडु लागली, तेव्हा वर्ग शिक्षिका संगिता जाधव यांनी तिच्या रहाण्याची व्यवस्था करीत तिच्या आई-वडीलांना आश्वस्थ केले. काजल पोलीस भरतीच्या मुलांसोबत तोडीसतोड धावतेय आणि धावताना अजिबात दमत नाही हे पाहून तिचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत जाधव यांनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला पाठींबा दिला. त्यांनी तिला धावण्याच्या स्पर्धेत उतरविले. परंतू तिची उंची कमी असल्याने चंद्रकांत जाधव यांनी तिला हॉकी खेळण्याचा सल्ला दिला. या दोन गुरुंनी काजलमधील गुण हेरत मदत केल्याने तिचे अक्षरश: भाग्य उजळले.

लेकीनं देशाचं नाव करावं 

काजल हीचे वडील सदाशिव आणि आई नकुसा दोघेही लेकीच्या कामगिरीने प्रचंड आनंदी आहेत. शेती कमी असल्याने परिस्थिती पाहून सर्व मुलांना जमेल तसं आम्ही थोडं थोडं शिकवले असल्याचे ते म्हणतात. परंतू काजलची जबाबदारी शिक्षकांनी घेतल्याने आणि तिला करीयर घडविण्यास मदत केल्याने त्यांचे खूप आभार असल्याचे सदाशिव सांगतात. मुलगी स्पर्धांत बक्षिसे मिळवितेय, खेळात पुरस्कार मिळवतेय हे पहायला शिक्षकांनी आम्हाला बोलविले होते. तिने आमचं नाव मोठं केलंय तिने आयुष्यात असेच अनेक बहुमान मिळवत देशाचं नाव मोठं करावे असे तिचे आई-वडीलांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी