तुमचा काचेचा महाल झाला आहे. मी पण पाटील आहे, चंद्रकांतदादांना सतेज पाटलांचे आव्हान

गोकुळच्या अध्यक्षपदावर अखेर महायुतीचे राजेश पाटील निवडून आले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरातील लढाई अखेर कोर्टात पोहचणार आहे असे स्पष्ट झाले आहे. महायुतीने विजय मिळवण्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदत घेतली आहे.

तुमचा काचेचा महाल झाला आहे. मी पण पाटील आहे, चंद्रकांतदादांना सतेज पाटलांचे आव्हान
satej patil
| Updated on: Nov 10, 2026 | 5:55 PM

गोकुळच्या अध्यक्षपदावर अखेर महायुतीचे राजेश पाटील निवडून आले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरातील लढाई अखेर कोर्टात पोहचणार आहे असे स्पष्ट झाले आहे. महायुतीने विजय मिळवण्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांनी दिलेल्या धमकीचा उल्लेख करत सतेज पाटील यांनी त्यांना प्रति आव्हान दिले आहे.

सतेज पाटील यावेळी म्हणाले की चंद्रकांतदादा पाटील जसे मोठे होत झाले आहे. तशी त्यांची वैचारिक पातळी खाली होत चालली आहे. २००९ पासून त्यांची माझी लढाई चालू आहे. परंतू स्वर्गीय डी. वाय.पाटील यांचा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे.त्यांना मध्ये आणायची काय गरज होती असा सवाल यावेळी सतेज पाटील यांनी केला आहे.

Loading...

कालची आमची सभा महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. कोल्हापूराकरांवर अन्याय झाला म्हणून बाहेरुनही लोक आले होते. आज त्यांची सभा पाहिली का ? आमच्या सभेत जसा करंट होता, तसा त्यांच्या सभेत नव्हता. त्यांचे चेहरे पाहा, त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते का ? असा सवाल सजेत पाटील यांनी यावेळी केला आहे.

सरकारी यंत्रणेच्या जोरावर मला धमकी देऊ नका

तुम्ही सरकारी यंत्रणेच्या जोरावर मला धमकी देऊ नका. निवडणूकीत कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूका लढूया. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन तुम्हाला उद्धवस्त करतो, तुम्हाला जीवनातून उठवतो असे बोलू नका, ही भाषा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, मी ही खपवून घेणार नाही असे यावेळी सतेज पाटील यावेळी म्हणाले. मॅनडेटच्या घालवयाचं पाप या लोकांनी केले आहे. आमच्या उलटा निकाल लागला तर या तेरांना घरी घालवून अशी ऑडिओ टेप आता बाहेर आली आहे.  काल बंटी पाटीलांचा जी सभा झाली, ही तुमची शेवटची सभा आहे, असेही ते म्हणाले हा उन्माद कुठला आहे.  सत्तेचा गैरवापर कसे हे लोक करत आहे हे आता स्पष्ट झाले आहे.  मला खात्री आहे की येणाऱ्या या न्यायालयीन लढाईत आम्हाला यश मिळेल असेही सतेज पाटील यावेळी म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us