पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा, 12 विशेष कार्यक्रम कोणते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. येत्या 17 सप्टेंबरंपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात सेवा संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात सेवा संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे. आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या सेवा संकल्प अभियानाबद्दल माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थित होती. या अभियानांतर्गत 12 वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
सेवा संकल्प अभियानादरम्यान राबवण्यात येणारे कार्यक्रम
यावेळी माहिती देताना अमित शाह यांनी सांगितलं की, या काळात रक्तदान शिबीर, आभार प्रदर्शन, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी कामे पोहोचवण्याचे अभियान, असा बारा कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना शाह यांनी म्हटलं की, 2014 पूर्वी जनता जातीवाद, भ्रष्टाचार, परिवारवादमध्ये अडकली होती. मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच जनता आणि जवान करारा जवाब देत आहे. ३७० कलम आणि नक्षलवाद आणि इतर गोष्टी आम्ही बंद केल्या. 25 कोटी लोकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत मिळत आहे. पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात, १३ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात. आकरा कोटी कुटुंबाला उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. 3 कोटी महिलांना लखोपती दीदी बनवलं आहे. रेल्वेचे झालेले आधुनिकारारण आणि विकास यामुळे भारत पुढच्या लेव्हला गेला आहे. आम्ही रक्ताचा एक थेंबही न सांडता ३७० कलम हटवून दाखवलं आहे. राम मंदिर, कशी विश्वनाथ मंदिर या सारख्या स्थळांचा आम्ही विकास केला. चंद्रयान ३ या सारखे अनेक मोहिमा आपण राबवल्या.