AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा, 12 विशेष कार्यक्रम कोणते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. येत्या 17 सप्टेंबरंपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात सेवा संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा, 12 विशेष कार्यक्रम कोणते?
Amit ShahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 5:41 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत एक महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात सेवा संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे. आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या सेवा संकल्प अभियानाबद्दल माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थित होती. या अभियानांतर्गत 12 वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

सेवा संकल्प अभियानादरम्यान राबवण्यात येणारे कार्यक्रम 

यावेळी माहिती देताना अमित शाह यांनी सांगितलं की, या काळात  रक्तदान शिबीर, आभार प्रदर्शन, नमो सेवा, संगीत नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, सेवा ज्योती कलस यात्रा, वाडनगर ते वाराणसी यात्रा, वाराणसी ते वाडनगर यात्रा, सेवा सेतू अभियान, ब्लॉक आणि तालुका स्तरावर सर्व सरकारी कामे पोहोचवण्याचे अभियान, असा बारा कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना शाह यांनी म्हटलं की,  2014 पूर्वी जनता जातीवाद, भ्रष्टाचार, परिवारवादमध्ये अडकली होती. मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच जनता आणि जवान करारा जवाब देत आहे. ३७० कलम आणि नक्षलवाद आणि इतर गोष्टी आम्ही बंद केल्या. 25 कोटी लोकांना प्रतिव्यक्ती  ५ किलो धान्य मोफत मिळत आहे.  पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात, १३ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात. आकरा कोटी कुटुंबाला उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे. 3 कोटी महिलांना लखोपती दीदी बनवलं आहे.   रेल्वेचे झालेले आधुनिकारारण आणि विकास यामुळे भारत पुढच्या लेव्हला गेला आहे. आम्ही रक्ताचा एक थेंबही न सांडता ३७०  कलम हटवून दाखवलं आहे.  राम मंदिर, कशी विश्वनाथ मंदिर या सारख्या स्थळांचा आम्ही  विकास केला. चंद्रयान  ३ या सारखे अनेक मोहिमा आपण राबवल्या.

Follow Us
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...