AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Teacher-Graduate Election: शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? युती की आघाडी कुणाचा गुलाल उधळणार? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी

Maharashtra Teacher and Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात कोण आमदार होणार आणि महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. आज 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे.

Teacher-Graduate Election: शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? युती की आघाडी कुणाचा गुलाल उधळणार? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? महायुती की महाविकास आघाडी कुणाचा गुलाल उधळणार?
| Updated on: Oct 27, 2026 | 6:44 AM
Share

Maharashtra Teacher and Graduate Constituency Election Result 2026 : आज विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात कोण बाजी मारणार हे समोर येईल. कोण आमदार होणार आणि महाविकास आघाडी की महायुती कोण बाजी मारणार याचे चित्र अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल. शुक्रवारी मतदान झाले होते. 182 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)या मतदारसंघात कोण कोणाला धोबीपछाड देणार हे समोर येईल. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होत आहे.

अटीतटीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. महायुतीमध्ये उमेदवारीवरून शिंदे सेनेने दंड थोपाटले. पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील भूमिकेचा आता कुणाला फायदा होतो हे समोर येईल. काही ठिकाणी मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. बंडखोरी आणि अपक्षांनीही या निवडणुकीत रंगत वाढवली. तर अंडरकरंटचा कोणत्या तगड्या उमेदवाराला फटका बसतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर महाविकास आघाडीत खरंच समन्वय होता का? त्यांना महायुतीमधील मतभेद आणि मनभेदाचा फायदा घेता आला का? हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल.

कोण होणार आमदार?

पुणे पदवीधर मतदारसंघ

स्मिता जाधव- भाजप

हर्षदा देशमुख-राष्ट्रवादी (शरद पवार)

पुणे शिक्षक मतदारसंघ मराठवाडा

कौस्तुभ गावडे-भाजप

सचिन सानप- शिवसेना शिंदे

जयंत आसगावकर-काँग्रेस

नागपूर पदवीधर मतदारसंघ

सुधाकर कोहळे-भाजप

अभिजीत वंजारी-काँग्रेस

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

सतीश चव्हाण- राष्ट्रवादी (अजित पवार)

प्रतापसिंह पाटील- राष्ट्रवादी (शरद पवार)

दिलीप घुगे- शिवसेना (ठाकरे)

अमरावती शिक्षक मतदारसंघ

किरण सरनाईक- शिवसेना (शिंदे)

आदिती पोहरे- काँग्रेस

शिक्षक, पदवीधरचा आज निकाल

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील मतमोजणी आज श्री शिवछत्रपती कीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.

अशी होणार मतमोजणी…

पदवीधरच्या मतमोजणीसाठी १०० टेबल

५ कक्षात प्रत्येकी १० टेबल

शिक्षकच्या मतमोजणीसाठी ४२ टेबल

३ कक्षात प्रत्येकी ७ टेबलच्या २ रांगा

प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक, एक शिपाई.

अमरावती शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी

शिक्षकांचा कौल कुणाला ? आज होणार फैसला

अमरावतीच्या लोकशाही भवनात मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण

सकाळी ८ वाजता पासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया प्रारंभ

मतमोजणीसाठी १७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

१४ टेबलांवर मतमोजणी, टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल

शिक्षक मतदारसंघात ३३ हजार ३४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.

निवडणुकीत ९२.२५ टक्के विक्रमी मतदान

१२ ते १६ तास मतमोजणीला लागण्याची शक्यता

२६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे आणि भाजपाच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्यात तिरंगी लढत झाल्याची चर्चा आहे. पहिल्या पसंतीचा 15 ते 16 हजाराचा कोठा कुठल्याही उमेदवारांनी पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार

विक्रमी मतदानानंतर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

विधान परिषेदच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी विक्रमी मतदान झाले. आज सकाळी 8 वाजता विविध मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरूवात होईल.

१.नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी 64.76 टक्के मतदान झाले. नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुलात आज मतमोजणी होत आहे.

२.अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी विक्रमी असे 91.08 टक्के मतदान झाले. शहरातील लोकशाही भवनात आज मतदान होईल.

३.पुणे पदवीधर मतदारसंघात 62.78 टक्के तर शिक्षक मतदारसंघात 85.87 टक्के मतदान होईल. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल.

४.छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 58.67 टक्के मतदान झाले. चिकलठाणा एमआयडीसीमध्ये आज मतमोजणी होणार आहे.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी