सुप्रिया सुळेंनंतर आता प्रफुल्ल पटेलही ब्रीच कँडी रुग्णालयात; शरद पवारांची घेतली भेट…, नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

सुप्रिया सुळेंनंतर आता प्रफुल्ल पटेलही ब्रीच कँडी रुग्णालयात; शरद पवारांची घेतली भेट..., नेमकं काय घडतंय?
Praful Patel
| Updated on: Nov 26, 2026 | 3:25 PM

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान शरद पवार हे विश्रांती घेत नसल्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे देखील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.’डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने शरद पवारांना ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण ते ऐकत नाहीत, त्यांना कामात रमून जायला आवडते, आता त्यांची तब्येत ठीक आहे. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Loading...

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार जेव्हा रुग्णालयात होते, तेव्हा देखील प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. आता पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. योगायोगाने माझ्या मुलीच्या सासुंचे देखील इथेच उपचार सुरू आहेत. त्यानंतर शरद पवार हे देखील रुग्णालयात दाखल झाल्याने मी इथे आलो. शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. मी भेटलो तेव्हा ते जेवण करत होते, त्यामुळे मी फारवेळ काही थांबलो नाही, त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us