…तर आज अधिक आनंद झाला असता: शरद पवार

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारा नेता म्हणूनही पवारांकडे पाहिले जाते. त्याचाच प्रत्यय काल कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये आला. सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना पवारांनी भाषणाच्या शेवटी आपला जीवलग सहकारी आणि माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबा कुपेकर यांची आठवण काढली. आज […]

...तर आज अधिक आनंद झाला असता: शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारा नेता म्हणूनही पवारांकडे पाहिले जाते. त्याचाच प्रत्यय काल कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये आला. सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना पवारांनी भाषणाच्या शेवटी आपला जीवलग सहकारी आणि माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबा कुपेकर यांची आठवण काढली. आज बाबा असते तर अधिक आनंद झाला असता, असं भाषण संपवताना पवार म्हणाले आणि व्यासपीठावरील खुर्चीकडे वळले.

बाबासाहेब कुपेकर यांचं निधन 26 सप्टेंबर 2012 रोजी झालं. बाबा कुपेकर हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जात होते. शरद पवार यांची अनेकांनी या ना त्या कारणांनी साथ सोडली. मात्र त्यावेळी बाबा कुपेकर यांनी पवारांना साथ दिली. याच निष्ठेची पावती म्हणून पवारांनी कुपेकर यांना आधी आमदारकी मग राज्यमंत्रीपद आणि नंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी दिली.

कानडेवाडीसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या बाबा कुपेकर यांनी आपली छाप राज्यपातळीवर पाडली होती. गावच्या सरपंचपदापासून ते विधानसभेचे अध्यक्षपद इथपर्यंत त्यांनी मजल मारली. पण त्यांच्या निधनामुळं राज्याच्या राजकारणाचा समग्र आवाका असलेला नेता पडद्याआड गेला. त्यानंतरही पवारांनी कुपेकर यांच्या कुटुंबियांशी सलोखा कायम ठेवला. म्हणूनच बाबांच्या निधनानंतर पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना विधानसभेत पाठवले. कालही कोल्हापुरात आले असता शरद पवार यांनी बाबा कुपेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या सहकाऱ्याबद्दलचा आदर कशा पदधतीनं पवार यांनी व्यक्त केला हे संबंध कोल्हापूरकरांनी पाहिलं.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.