आजारपणाला गाडून शरद पवार पुन्हा मैदानात, 3 दिवसांचे कार्यक्रम जाहीर

बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान आहे. त्यामुळे शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याची सूचना दिली असताना ते घरुन कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

आजारपणाला गाडून शरद पवार पुन्हा मैदानात, 3 दिवसांचे कार्यक्रम जाहीर
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 7:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे शरद पवार आज दिवसभर बारामतीत मोदी बागेत विश्रांती करण्यासाठी थांबले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान आहे. त्यामुळे शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याची सूचना दिली असताना ते घरुन कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. यानंतर आता शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन महत्त्वाची माहिती दिली आहे.

“ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री. अजिंक्य योद्धा आदरणीय शरद पवार! अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले. पण या योद्ध्याने गेल्या 22 दिवसात तब्बल 52 सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ 1 दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय. हाती विचारांचं हत्यार घेऊन… म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन मिशा काढण्यासाठी तयार रहावं”, असं रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांचे तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर

रोहित पवार यांनी शरद पवार यांचे तीन कार्यक्रम जाहीर केले आहेत. शरद पवार 8 मे ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची श्रीगोंदा येथे सभा होणार आहे. तसेच त्यांनी याच दिवशी शिरुर येथेही सभा होणार आहे. यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता अहमदनगर येथे सभा होणार आहे.

शरद पवार यांची 9 मे ला सातारा येथे झाली होती. याच दिवशी त्यांची संध्याकाळी अंबाजोगाई येथे सभा पार पडणार आहे. शरद पवार 10 मे ला पुण्यात येणार आहेत. या दिवशी वडगाव शेरी येथे सभा पार पडणार आहे. तसेच संध्याकाळी चाकण येथे त्यांची सभा पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.