‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको’, जयंत पाटील यांची खोचक टीका

शेकाप नेते जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. "सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको", अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या टीकेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही आता व्हायरल होत आहे.

'सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको', जयंत पाटील यांची खोचक टीका
अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 4:18 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच पक्षातील दिग्गज नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली. सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुतीची दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हा तिथे अजित पवार यांच्यासोबतही सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. सुनील तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण यावरुन शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधलाय.

“सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मुरुडमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यांच्या या टीकेवर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, स्वत: अजित पवार किंवा सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा राष्ट्रवादीचा एकमेव माणूस भुसार आहे. सर्वांनी फसवलं. आमची मतं एवढी नव्हती. आमची 5 हजारच मतं होती. आम्ही 11 हजारापर्यंत गेलो कारण बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं. प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि काम केलं. बंधूंनी पुन्हा फसवलं. मी बाळाराम साहेबांना बोललो की, नको उभा राहूस. विधानसभेला उभा राहा. पण ऐकलं नाही. त्याचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थांची कामे मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली, दादा म्हणजे का? दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाहीत”, असं जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.