मोठी बातमी! भाजप मंत्र्याचं घर फुटलं! सख्खा भाऊ थेट शिवसेनेत; जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वात जबर धक्का
Shekhar Gore Shiv Sena: माण-खटावमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

साताऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेले मोठे खिंडार पडले आहे. पक्षाच्या बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे. साताऱ्यातील माण-खटावमध्ये हा राजकीय भूकंप झाल्याचे समोर आले आहे. हा नेता भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भाऊ आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी नवे आव्हान उभे राहिले आहे. यानंतर साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माण-खटाव तालुक्यात या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ आगामी काळात होणार आहे.
शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल होणार आहेत. या घडामोडीनंतर एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला आहे. यामुळे भाजप आमदार जयकुमार गोरे आणि उद्धव ठाकरेंचं गणित बिघडणार असल्याचे चित्र आता समोर आले आहे. त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जवळ आली आहे. यातच आता ही घडामोड एकनाथ शिंदेंसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं चित्र आता दिसून येत आहे.
शेखर गोरे हे जयकुमार गोरेंचे लहान सख्खे बंधू आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगत आहेत. आगामी निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातून दोन सख्खे भाऊच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असल्याचे चित्र दिसण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यातच नवं गणित दिसून येत आहे. यामुळे आता आगामी साताऱ्यात राजकीय समीकरणं बदलणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
