शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?

जंतरमंतर आंदोलनानंतर जेन झीचे महत्व राजकारण्यांना पटले असल्याने आता शिंदे सेनेचे युवा खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कंबर कसली आहे.

शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
Shrikant Shinde
| Updated on: Aug 24, 2026 | 6:23 PM

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या एका टिप्पणी वरुन स्थापन झालेल्या क्रॉकोच जनता पार्टीने सर्व राजकारण्यांना हादरवून सोडले आहे. दिल्लीत संसदेवर क्रॉकोच जनता पार्टीने हल्लाबोल केल्यानंतर जेन झीची ताकद सर्व राजकीय पक्षांना कळाली आहे. आता सत्ताधारी पक्षातील भाजपाने जेन झीशी संवाद साधण्यासाठी खास सेमिनार घेतले. आरएसएस या मातृसंघटनेते सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झीशी संवाद साधला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जेन-झीशी संवादाचा काल एक कार्यक्रम घेतला. त्यानंतर महायुतीतील शिंदे गट देखील आता जेन झीशी संवाद साधणार आहे.

शिवसेनेचा युवा संवाद

शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील आता Gen Z वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.  खासदार श्रीकांत शिंदे उद्या Gen Z सोबत संवाद साधणार आहेत. या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन उद्या मंगळवारी सायंकाळी  साडे सहा वाजता होणार आहे. या संवाद सोहळ्यात युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे हे युवकांच्या समस्या,अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेणार आहेत.

तरुण पिढीचा आवाज ओळखला

कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन मोठे आंदोलन उभे केले. त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला होता. एनडीए सरकारचा हा पहिला राजीनामा होता. त्यामुळे या आंदोलनाचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. त्यानंतर आता सीजेपीने राज्यातील शाळांचा प्रश्न हाती घेतला आहे. मात्र, त्याच्या आधीपासून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी राज्या राज्यात छात्रों की गुंज द्वारे युवा तरुण पिढीचा आवाज ओळखला होता. राहुल गांधी यांच्या कोटा,  प्रयागराज आणि नुकत्याच पुण्यात झालेल्या  छात्रों की गुंजला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us