Pune News : पुण्यात थरार, पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबाराची घटना, कोयत्याने हल्ला
पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्याच्या गेट नंबर 4 बाहेर ही घटना घडली आहे. एकावर कोयत्याने हल्ला झाला आहे. काही जण जखमी झाले आहेत.

Breaking news
पुण्यात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. पुण्यात कायदा-सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण चक्क पुणे कोर्टाच्या परिसरातच गोळीबाराची घटना घडली. आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वत:चा बचाव करुन पळत असताना कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्तीचे दोन हात शरीरापासून वेगळे झाले. ही खूप भयानक घटना आहे. पुणे शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात ही घटना घडली.
(बातमी अपडेट होत आहे)
Follow Us
