AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे दंगामंत्री, नंगामंत्री मुद्द्याम… ठाकरे गटाच्या नेत्याचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप, थेट दोन मंत्र्यांना..

अखिल चित्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी थेट काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याकरिता मुद्द्याम र्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केली जात असल्याचे म्हटले.

हे दंगामंत्री, नंगामंत्री मुद्द्याम... ठाकरे गटाच्या नेत्याचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप, थेट दोन मंत्र्यांना..
Shiv Sena Thackeray faction
| Updated on: May 27, 2026 | 7:42 AM
Share

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाना साधला. ही पहिलीच वेळ नाही की, सत्ताधाऱ्यांवर अखिल चित्रे यांनी टीका केली. कायमच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. नुकताच पोस्ट शेअर करत त्यांनी मंत्र्यांना टार्गेट करत खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटले की, राज्यातील एक मंत्री तर जणू ‘दंगामंत्री’च बनले आहेत. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर बोलण्याऐवजी सतत धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करून वातावरण पेटत ठेवण्याचेच काम करण्यात मस्त आहेत. दुसऱ्या बाजूला कोणत्याही संविधानिक पदावर नसलेले व्हिडिओ व्हायरल स्टार – भाजपाचे ‘नंगामंत्री’ रोज उठून उत्तेजक भाषा वापरत समाजात ध्रुवीकरण पसरवण्याचा उद्योग करत फिरत आहेत.

सतत महाराष्ट्रात धगधगतं वातावरण राहावं, राज्य गुंतवणुकीसाठी पोषक नाही असं चित्र निर्माण व्हावं आणि जनतेचं लक्ष महिला आणि बालसुरक्षा ,ड्रग्ज नेटवर्क,पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी संकट, पाणीटंचाई, दुष्काळ, पेपरफुटीमुळे आत्महत्या व मुलींवरील वाढत्या अत्याचार ह्या खऱ्या प्रश्नांपासून विचलित व्हावं यासाठीच हे दंगामंत्री-नंगामंत्री प्रयत्नशील आहेत.

आता अखिल चित्रे यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. थेट राज्यातील दोन मंत्र्यांना त्यांनी दंगामंत्री-नंगामंत्री म्हटले. आता अखिल चित्रे यांच्या या पोस्टवर भाजपामधून नक्की काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राज्यातील महत्वाचे प्रश्न विचलित करण्याकरिताच धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी शेअर केलेली पोस्ट..

अखिल चित्रे यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी 2024 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अखिल चित्रे सोशल मीडियावरुन सातत्याने मुद्दे मांडतात. विशेष म्हणजे अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टही चांगल्याच व्हायरल होताना कायमच दिसतात. आता अखिल चित्रे यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलाच चर्चेचा मुद्दा बनली आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल