वांद्र्यातील स्पा केंद्राला विरोध, मनसे नेते अखिल चित्रेंसह दोघांना अटक

वांद्रे येथील खैरवाडी विभागातील समाधान सोसायटीमध्ये तयार होणाऱ्या स्पा केंद्राला विरोध केल्याने मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्यासह 2 जणांना खैरवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

वांद्र्यातील स्पा केंद्राला विरोध, मनसे नेते अखिल चित्रेंसह दोघांना अटक
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 1:38 AM

मुंबई : वांद्रे येथील खैरवाडी विभागातील समाधान सोसायटीमध्ये तयार होणाऱ्या स्पा केंद्राला विरोध केल्याने मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्यासह 2 जणांना खैरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. इमारतीमधील नागरिकांचा या स्पाला जोरदार विरोध आहे. समाधान सोसायटीच्या तळ मजल्यावर दोन गाळ्यांना एकत्र करून एक स्पा केंद्र तयार करण्यात येतंय. मात्र, यासाठी सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करीत असल्याचा आरोप इमारतीमधील रहिवाशांचा आहे (MNS leader Akhil Chitre arrested due to oppose to Spa centre in Bandra).

गुरुवारी (21 जानेवारी) या ठिकाणी वीज जोडणी करण्यास अदानी कंपनीचे कर्मचारी आले. त्यावेळी सोसायटीमधील रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला. यावेळी त्यांनी मनसेचे नेते अखिल चित्रेंनाही बोलावलं. यावेळी या गाळ्यात काम करणारे कर्मचारी संतोष देवलेकर यांना मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मनसेवर करण्यात आलाय.

या मारहाणी प्रकरणी अखिल चित्रे आणि इमारतीमधील रहिवासी अमोल भुरके, अजय ठाकूर यांच्यासह काही लोकांवर आरोप आहेत. खैरवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय. या तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र ही अटक चुकीची असल्याचा आणि सदर स्पा केंद्र रहिवासी इमारतीमध्ये नको, अशी भूमिका इमारतीमधील रहिवाशांनी मांडली आहे.

हेही वाचा :

मनसेच्या दणक्यानंतर ॲमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टलाही उपरती, मराठी भाषेचाही पर्याय उपलब्ध

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

2010 ला मेट्रोला विरोध करणारे बच्चन सरकार बदलल्यावर बदलले का? : मनसे

व्हिडीओ पाहा :

MNS leader Akhil Chitre arrested due to oppose to Spa centre in Bandra

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.