AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर स्क्रीन फोडणार, भारत -पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक, नेत्यानं दिला थेट इशारा

आशिया कपमध्ये उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे, मात्र या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, शरद कोळी यांनी थेट इशारा इशारा दिला आहे.

...तर स्क्रीन फोडणार, भारत -पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक, नेत्यानं दिला थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2025 | 9:44 PM
Share

आशिया कप सुरू आहे, उद्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. मात्र या सामन्याला अनेकांकडून विरोध केला जात आहे. भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळू नये असं भारतामधील अनेक क्रिकेट चाहात्यांचं मत आहे, मात्र या सामन्याला भारत सरकारने परवानगी दिल्यानं हा सामना होणार आहे.  दरम्यान दुसरीकडे मात्र या सामन्यावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळू शकता असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  आशिया कपमध्ये ८ देश सामिल होतात. ऑलिम्पिकमध्ये सर्व जग सहभागी असतं. 1980 मध्ये मॉस्कोमध्ये ऑलिम्पिक होतं. रशियाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती, म्हणून अमेरिकेने ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध होत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील इशारा दिला आहे. भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवणाऱ्या हॉटेल्समधील स्क्रीन बॅटने फोडणार, असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणले शरद कोळी? 

भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवणाऱ्या हॉटेल्समधील स्क्रीन बॅटने फोडणार, असा इशारा शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना दिला आहे. हातात बॅट घेत शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना हा इशारा दिला आहे.  भारतातील माता भगिणींच्या कपाळाचं कुंकू पुसणाऱ्या पापी आणि नीच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे. महाराष्ट्रातील हॉटेल चालक मालकांचे हिंदुस्थानावर प्रेम असेल तर भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर कोणीही दाखवणार नाही. जर कोणी स्क्रीनवर मॅच दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ती स्क्रीन फोडून टाकणार. त्याला हॉटेल मालक जबाबदार असणार असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे, दरम्यान आता उद्या हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...