Shivsena Supreme Court Hearing : लवकरच कळणार शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कोणाचा? अंतिम टप्प्यातल्या सुनावणीची पुढची तारीख आली समोर

Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हा खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेसह देशाचं या खटल्याच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. या खटल्याच्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला आहे.

Shivsena Supreme Court Hearing : लवकरच कळणार शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कोणाचा? अंतिम टप्प्यातल्या सुनावणीची पुढची तारीख आली समोर
Shivsena Supreme Court Hearing
| Updated on: Oct 26, 2026 | 8:08 AM

शिवसेना पक्ष कोणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा? धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार? कोणाला मिळणार? याकडे महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरु झाली होती. पण सध्या सुनावणीला ब्रेक लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह खटल्याची सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचा हा खटला प्रलंबित आहे. साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. न्यायालयाने जवळपास महिनाभराने, 23 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हा संदर्भातील सुनावणी बऱ्याचदा पुढे ढकलली गेली आहे.

या खटल्याच्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला आहे. ठाकरे गटाकडून दिग्गज वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. शिंदे गटाकडून हरीश साळवे, मुकुल रोहतगी, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी ही नाव चर्चेत होती. पण सध्या शिंदे गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह बाजू मांडत आहेत. ज्यावेळी हा खटला दाखल झाला, ती महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपून गेली आहे. पण या खटल्याचा निकाला ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांचं या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

Loading...

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

पक्षांतर आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेला कौल असं सगळ या खटल्यामध्ये आहे. न्यायालयाची भूमिका काय असणार? न्यायालय या सगळ्याकडे कुठल्या दृष्टीकोनातून पाहत? हे महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा या खटल्याचा निकाल महत्वाचा आहे. कारण अधिकृत शिवसेना पक्ष कोणाचा? धनुष्यबाण हे चिन्ह कुणा एकाला देणार की गोठवणार हे महत्वाचं ठरणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी आपल्या युक्तीवादात निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कारण निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्हा आपसूकच एकनाथ शिंदेंना मिळालं. निवडणूक आयोगाने हा निकाल देताना विधिमंडळातील संख्याबळ कोणाच्या बाजूने आहे ते ध्यानात घेऊन निकाल दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us