टायगर श्रॉफरच्या गाडीवर गोळीबार, गोळ्या कोणी झाडल्या? सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे.

टायगर श्रॉफरच्या गाडीवर गोळीबार, गोळ्या कोणी झाडल्या? सर्वात मोठी बातमी समोर
tiger shroff
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 9:12 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. या घटनेत टायग श्रॉफचा वाहनचालक जखमी झाला आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. टायग श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची जबादारी लॉरेन्स बिश्रोई गँगकडून स्विकारण्यात आली आहे. एक फेसबुक पोस्ट करत लॉरेन्स बिश्रोई गँगकडून  या गोळीबाराची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. मुंबई फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये जो आमचं म्हणणं ऐकणार नाही, किंवा सलमान खानसोबत काम करेल आता पुढचा नंबर त्याचा असेल, अशी धमकी देखील या पोस्टमधून देण्यात आली आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? 

Loading...

टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्रोई गँगकडून स्विकारण्यात आली आहे. ‘जय महाकाल,  जय श्रीराम आज टायग श्रॉफवर गोळीबार झाला. याची जबाबदारी  अनिल पंडीत आणि हरमन संधू यांनी घेतली आहे.  आम्ही त्याला फोन करून समजावलं होतं, परंतु त्याला समजलं नाही, त्यामुळे आज आम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं आहे.  मुंबई फिल्म इंड्रस्ट्रीमध्ये जो आमचं म्हणणं ऐकणार नाही, किंवा सलमान खानसोबत काम करेल आता पुढचा नंबर त्याचा असेल,’ अशी धमकी या पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. फूटबॉल मॅच खेळून घरी परतत असताना टायगर श्रॉफ यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन लोकांकडून टायगर श्रॉफ याच्या वाहनावर चार ते पाच राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असं या ऑफिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us