जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो… अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; ट्विटमध्ये काय म्हटलं?

बीडमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप असून, अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो... अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; ट्विटमध्ये काय म्हटलं?
anjali damania dhananjay munde
| Updated on: Jul 02, 2025 | 10:26 AM

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी धनंजय मुंडेंनी याप्रकरणाची चौकशी विशेष चौकशी समितीतर्फे केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्‍यांकडे केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. आता याप्रकरणावरुन सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी आज दुपारी २ वाजता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही सवालही केले आहेत. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असेही अंजली दमानिया यांनी ठणकावून सांगितले.

अंजली दमानिया यांच्या ट्वीटमध्ये काय?

इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे.

काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही.

वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असे अंजली दमानिया ट्वीट करत म्हणाल्या.

मला वाटतं हा राजकारणाचाच एक भाग

यावेळी अंजली दमानिया यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “आता ज्या घटकेला मला एवढंच वाटतं की ह्यांचा जो लढा आहे तो अस्तित्वाचा लढा आहे मराठी माणसासाठी नक्कीच नाहीये. कारण आता महाराष्ट्राच्या विधान भवनात जी माणसं बसलेली आहे ती सगळीच मराठी माणसं आहेत आणि त्या सगळ्या मराठी माणसाने खरंतर एकत्रपणे महाराष्ट्रासाठी लढायला हवं पण डोक्यात भरवल्या जाते की आमची शिवसेना असो किंवा मनसे असो हीच फक्त मराठी माणसासाठी लढते हे सगळं दाखवणं मला वाटतं हा राजकारणाचाच एक भाग आहे”, असे अंजली दमानियांनी म्हटले.