AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरेडे पाषाण, केडीएमसीच्या उपायुक्तांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सहाय्यक आयुक्तांच्या सेवा निवृत्तीचा निरोप सभारंभ चक्क महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला (social distancing rules are not follow in KDMC Deputy Commissioner Retirement Programme)

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरेडे पाषाण, केडीएमसीच्या उपायुक्तांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
| Updated on: Feb 26, 2021 | 8:28 PM
Share

कल्याण (ठाणे) : केडीएमसीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरीकांना लग्न, हळदी सभारंभ करु नयेत आणि गर्दी जमवू नये, असं आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. गर्दी जमविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. सहाय्यक आयुक्तांच्या सेवा निवृत्तीचा निरोप सभारंभ चक्क महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. पण या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला (social distancing rules are not follow in KDMC Deputy Commissioner Retirement Programme).

केडीएमसीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

कल्याण डोबिवली महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे नव्याने 175 रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जवळपास 63 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1165 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. तोंडावर मास्क, दुकानात सॅनिटायझर, ग्राहकांची गर्दी नको, हळदी, लग्न सभारंभात केवळ 50 जण उपस्थित राहू शकतात, असा आदेश काढला आहे. नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरु आहे.

कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

हे सगळे केले जात असाताना आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरुण वानखेडे यांचा सेवा निवृत्ती सभारंभाचे आयोजन महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या दालनात करण्यात आले होते. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दालन भरले होते. सर्वांच्या तोंडावर मास्क होते. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला बघायला मिळाला.

आयुक्त कारवाई करणार का?

याप्रकरणी आता महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी काय कारवाई करणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरेडे पाषाण’, अशी म्हण केडीएमसीला लागू पडत आहे. या सर्व प्रकारामुळे केडीएमसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे (social distancing rules are not follow in KDMC Deputy Commissioner Retirement Programme).

हेही वाचा : VIDEO : ‘तुम्ही यूपी, बिहारमधून यायचं, आम्हाला हिंदीत बोला सांगायचं’, मराठी येत नाही बोलणाऱ्या पोलिसावर मनसे कार्यकर्ते भडकले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.