VIDEO : ‘तुम्ही यूपी, बिहारमधून यायचं, आम्हाला हिंदीत बोला सांगायचं’, मराठी येत नाही बोलणाऱ्या पोलिसावर मनसे कार्यकर्ते भडकले

एका आरपीएफ जवानाने कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितलं, यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात जवानाची शाळा घेतली (Kalyan MNS party workers angry on RPF jawan who said talk in hindi language).

VIDEO : 'तुम्ही यूपी, बिहारमधून यायचं, आम्हाला हिंदीत बोला सांगायचं', मराठी येत नाही बोलणाऱ्या पोलिसावर मनसे कार्यकर्ते भडकले
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 5:10 PM

कल्याण (ठाणे) : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा यायलाच हवी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे. मनसेच्या याच मुद्द्यावरुन मराठी माणसाचा मनसेला खंबीर पाठिंबा आहे. याशिवाय या मुद्द्यासाठी मनसे अनेकवेळा आक्रमक झाल्याचं आपणही बघितलं आहे. मनसेचा असाच काहीसा आक्रमकपणा कल्याणमध्ये बघायला मिळाला आहे. एका आरपीएफ जवानाने कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितलं, यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात जवानाची शाळा घेतली (Kalyan MNS party workers angry on RPF jawan who said talk in hindi language).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकवर तृतीयपंथीय नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात, अशी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मनसे पदाधिकारी रोहन आक्केवार आणि इतर कार्यकर्ते काल (25 फेब्रुवारी) रात्री स्टेशन परिसरात पोहोचले. गाडी पार्किंग करत असताना तेथील आरपीएफ जवनांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला.

आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने एका कार्यकर्त्याने मराठीत बोला, असं सांगितलं. त्यावर जितेंद्र सिंग नावाच्या जवानाने तुम्ही हिंदीत बोला, मला मराठी येत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि इतर कार्यकर्त्यांनी त्या आरपीएफ जवानाची भररस्त्यात मराठीची शाळा घेतली. “महाराष्ट्रात ड्युटी करता आणि मराठी बोलता येत नाही. आम्हाला सांगता हिंदीमध्ये बोला हे चालणार नाही”, असा सज्जड दम दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यानंतर सर्व मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा तृतीयपंथीयांकडे वळवला. मनसे कार्यकर्त्यांना पाहून तृतीय पंथीयांनी पळ काढला. फक्त एक तृतीय पंथी त्यांच्या हाती लागला. त्याला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देत यापुढे असा प्रकार होता कामा नये, असे तृतीयपंथीयाला सांगितले (Kalyan MNS party workers angry on RPF jawan who said talk in hindi language).

पाहा व्हिडीओ:

हेही वाचा : त्या संशयास्पद गाडीचे मालक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर, पोलिसांकडून चौकशी सुरु

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.