त्या संशयास्पद गाडीचे मालक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर, पोलिसांकडून चौकशी सुरु

त्या संशयास्पद गाडीचे मालक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर, पोलिसांकडून चौकशी सुरु (scorpio car owner reach at mumbai crime branch, police inquiry going on)

त्या संशयास्पद गाडीचे मालक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजर, पोलिसांकडून चौकशी सुरु

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ गुरुवारी रात्री एक अज्ञात स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत स्फोटके आणि एक पत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सदर गाडीची माहिती काढली असता ही कार चोरीची असल्याचे उघड झाले. विक्रोळी येथून ही कार झाली असून, याबाबत गाडीच्या मालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मनसुख हिरेन असे या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचे नाव असून त्यांना मुंबई क्राईम ब्रांचने आज चौकशीसाठी बोलवले. मनसुख हिरेन हे क्राईम ब्रांचमध्ये चौकशईसाठी हजर झाले असून, याप्रकरणी पोलीस त्यांचा जबाब नोंदवत आहेत.

काय म्हणाले मनसुख हिरेन?

गाजीचे मालक मनसुख हिरेन यांना क्राईम ब्रांचने जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. माझी गाडी 17 तारखेला संध्याकाळी गाडीचे स्टेअरिंग जॅम झाले होते. मला मुंबईत तात्काळ एका कामासाठी यायचे होते म्हणून मी एरोली ब्रिजजवळ गाडी पार्क करून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी तिथे गेलो असता गाडी जागेवर नव्हती. मी गाडीचा तीन तास शोध घेतला. आरटीओने ताब्यात घेतली आहे का ते ही चेक केले. मात्र गाडी सापडली नाही म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांनी मीडियाशी बोलताना दिली.

गाडीत स्फोटकांसह धमकीचे पत्र

अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकांसोबतच एक धमकीचे पत्रही ठेवण्यात आले होते. याआधीही अंबानी यांना धमकीचे पत्र आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. संबंधित परिसर हा व्हिआयपी परिसर आहे. विशेष म्हणजे ज्या रोडवर गाडी उभी होती त्या रस्त्यावर सर्व मंत्री, मोठमोठे उद्योगपती यांची ये-जा असते.

 

संबंधित बातम्या

मुकेश अंबांनींच्या घराजवळ पार्क केलेल्या ‘त्या’ गाडीत मिळाल्या नंबरप्लेटस; RTO च्या रेकॉर्डमध्ये चक्रावणारी माहिती

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली कार चोरीची; विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली चोरी

Published On - 4:05 pm, Fri, 26 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI