अंबानींच्या घराबाहेर सापडलेली कार चोरीची; विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली चोरी

ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे (Suspicious Vehicle Stolen From Vikhroli).

  • कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 11:01 AM, 26 Feb 2021
अंबानींच्या घराबाहेर सापडलेली कार चोरीची; विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली चोरी

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या (Suspicious Vehicle Stolen From Vikhroli) अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी (25 फेब्रुवारी) रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे (Suspicious Vehicle Stolen From Vikhroli).

संशयास्पदरित्या स्फोटक भरुन आलेली ही गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती, अशी माहिती आहे. तशी तक्रारही विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे.

यावरुन आरोपींनी संपूर्ण कट रचूनच हा फक्त इशारा दिला होता, हे स्पष्ट होते. तसं गाडीत मिळालेल्या पत्रामध्येही आढळून आले आहेत.

गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये काय लिहले होते?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

गाडीत अनेक नंबरप्लेट्स

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून निघून गेला.

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र, या नंबरप्लेटसचे वाहतूक विभागाकडे (RTO) असलेले रेकॉर्ड तपासल्यावर चक्रावणारी माहिती समोर आली आहे.

1) MH 04 DN 9945

गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी केली असता गाडीचे पुर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले असून गाडी “कोलंबिया एम्बसी, परदेशी गाडी” असं रजिस्ट्रेशन मध्ये नमूद करण्यात आलय हा गाडी

12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशन मध्ये गाडी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना गाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन लकी डी या मुलूंडमधील व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे .(Suspicious Vehicle Stolen From Vikhroli)

2) MH 01 BU 6510

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी सहा वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असल्याचे RTO रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केले आहे.

3) MH 01 CZ 7239

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालकाचे नाव रजिस्टर मध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले आहे आणि गाडी ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टर मध्ये नमूद आहे

4) MH 01 DK 9945

या गाडीचा नंबरदेखील मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपणीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी एक वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं RTO रजिस्ट्रेशन मध्ये नमूद आहे.

Suspicious Vehicle Stolen From Vikhroli

संबंधित बातम्या :

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी